Santosh Deshmukh Case : '...हे तर गृहखात्याचं अपयश'; संजय राऊतांची टीका (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. त्यातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘हे गृहखात्याच अपयश आहे. बीडसह पोलीस खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर आहे की नाही अजूनही हा प्रश्न आहे. आमच्यासमोर आजही बीडचे पोलीस खातं हे मुंबईतून नियंत्रण केले जात नसून हे कोणीतरी अज्ञात शक्तीच आहे’.
संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. कुमाल कामरावर बोलताना ते म्हणाले, ‘माझं कालच त्याच्याशी बोलणं झालं मी त्याला म्हणालो आपण कायद्याला सामोरे जावे. तो काही अतिरेकी आहे का? देशद्रोही कोण आहे तो अल् कायद्याचा मेंबर आहे का? कुणाल कामरा गद्दार फुटीरतावादी आहे का? बेईमान गद्दार आहे का? नाही या देशाच्या बाबतीत. असे हल्ले आम्ही देखील सहन केले आहेत. महाराष्ट्रात कायदेशीर कारवाई कोणी केली असेल तर त्याला आपण सामोरे जायला पाहिजे.
तसेच जेव्हा कंगना राणावतचा आणि आमचा एक वाद झाला, तिने मुंबईला पाकिस्तान म्हटलं याच्यावर मुंबईचे लोक चिडले. मुंबईला पाकिस्तान म्हटलं. तुम्ही आमच्यावर टीका करा. आमच्या पक्षावर टीका करा. त्याच्यावर केंद्राला असं वाटलं की, कंगना राणावत धोका होऊ शकतो. तेव्हा केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था दिली. 27 सशस्त्र पोलीस मग त्याच प्रकारची सुरक्षाव्यवस्था त्याच कारणासाठी कुणाल कामराला मिळावी.
तसेच उद्या माझं कोणाशीही बोलणं होऊ शकतं, महाराष्ट्रात कोणी भीती उभी केली नाही. कुणाल कामरा शिंदेंच्या लोकांना शत्रू वाटत आहे म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का? तर आम्हाला देखील नरेंद्र मोदी, अमित शहा राज्याचे शत्रू वाटत आहे. पण तुम्ही त्यांच्या पायाशी जाऊन बसत आहात ना?, असेही त्यांनी म्हटले आहे.