Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेळणी विक्रेत्याकडून 6 कोटी उकळणे मुंब्रा पोलिसांच्या येणार अंगलट, प्रकरणाचा तपास सुरू

या प्रकाराविषयी ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांना विचारले असता, याबाबत चौकशी करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांकडून तक्रार अर्जाची शहनिशा केली जात आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 11, 2022 | 11:25 AM
खेळणी विक्रेत्याकडून 6 कोटी उकळणे मुंब्रा पोलिसांच्या येणार अंगलट, प्रकरणाचा तपास सुरू
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंब्य्रातील एका घरामध्ये टाकलेल्या छाप्यात तब्ब्ल ३० कोटींची रोकड आढळून आल्यानंतर त्यातील सहा कोटी रुपयांवर पोलिसांनीच डल्ला मारल्याची लेखी तक्रार ठाणे पोलिसांकडे (Thane Police) प्राप्त झाली आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत चौकशी करण्यात येत आहे, असे ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांनी सांगितले.

याबाबतचा तक्रार अर्ज व्हायरल झाला असून अर्जावर २५ एप्रिलची तारीख आहे. पोलिस आयुक्तांकडे ही तक्रार करण्यात आली असली, तरी या अर्जावर पोलिसांची सही आणि शिक्का नाही. परंतु, हा प्रकार घडल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

[read_also content=”गेल्या १० दिवसांत टोमॅटोच्या भावात तिपटीने वाढ, दर ६० रुपये प्रतिकिलोवर! https://www.navarashtra.com/maharashtra/tomato-prices-touch-rs-60-per-kg-again-in-retail-following-dip-in-supply-nrps-278573.html”]

१२ एप्रिलच्या मध्यरात्री मुंब्रा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह खासगी व्यक्तींना सोबत घेऊन मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीतील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला. यावेळी घरात ३० कोटी रुपये होते. हे पैसे पोलिस ठाण्यात आणले. नंतर या व्यक्तीला पोलिसांनी खडसावले. यातील काही पैसे देण्याची मागणी छाप्यात सहभागी असलेल्यांनी केली. यावर ही व्यक्ती दोन कोटी रुपये देण्यास तयार झाली. परंतु त्याला ३० कोटींपैकी २४ कोटी रुपये परत करण्यात आले. सहा कोटी रुपये काढून घेण्यात आले. एवढे पैसे कसे काय घेतले, अशी विचारणा या व्यक्तीने केल्यावर एका पोलिसाने त्याला हाकलून दिले, असे तक्रारीत म्हटले आहे. सहा कोटींची लूट केल्याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही तक्रारदाराने केली. जास्त पैसे घेतल्यावरून पोलिस आणि अन्य एक व्यक्ती यांच्यात भांडण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकाराविषयी ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांना विचारले असता, याबाबत चौकशी करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांकडून तक्रार अर्जाची शहनिशा केली जात आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.

[read_also content=”मध्य रेल्वेची प्रवाशांना सापत्न वागणूक, हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद होणार? प्रवाशांकडून संतप्त भावना https://www.navarashtra.com/maharashtra/angry-sentiment-from-passengers-that-ac-locomotives-on-central-railways-harbor-route-will-be-shut-down-278570.html”]

Web Title: Mumbra cops extorted rs 6 cr from toy dealer thane cp says an inquiry is on nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2022 | 11:25 AM

Topics:  

  • Thane Crime
  • Thane Crime News

संबंधित बातम्या

Thane Crime: घरकाम करणारी महिला चार दिवस गैरहजर; संतापलेल्या मालकिणीच्या मुलाने रोखली बंदूक, ठाण्यातली घटना
1

Thane Crime: घरकाम करणारी महिला चार दिवस गैरहजर; संतापलेल्या मालकिणीच्या मुलाने रोखली बंदूक, ठाण्यातली घटना

Thane Crime: कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचे औषध दिले… ; आरोपी युट्युब पत्रकार
2

Thane Crime: कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचे औषध दिले… ; आरोपी युट्युब पत्रकार

Thane Crime: हायवेजवळ आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा उलगडा; पत्नीनेच केली भावासोबत मिळून पतीची हत्या; कारण काय?
3

Thane Crime: हायवेजवळ आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा उलगडा; पत्नीनेच केली भावासोबत मिळून पतीची हत्या; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.