
My Village Healthy Village Campaign ( 36 माझे गाव, निरोगी गाव अभियान )
गावाचा खरा विकास हा केवळ रस्ते, पाणी आणि इमारतींपुरता मर्यादित नसून गावातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य उत्तम असणे हीच विकासाची खरी ओळख आहे.” प्रत्येक गावामध्ये स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासणी, माता व बाल आरोग्य संवर्धन, लसीकरण तसेच संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, शाळा, अंगणवाडी तसेच ग्रामस्थ यांच्या सामूहिक सहभागातूनच आरोग्यसंपन्न गावाचे स्वप्न साकार होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावाने आरोग्याबाबत जागरूक होऊन स्वच्छता आणि आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगीकाराव्यात. प्रत्येक बालक निरोगी, प्रत्येक माता सुरक्षित, प्रत्येक कुटुंब आरोग्यसंपन्न आणि प्रत्येक गाव रोगमुक्त व्हावे, ही अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्वांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती श्रीमती वनिता दुबळे, उपसभापती श्रीमती रेश्मा शेडगे तसेच पंचायत समिती सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना सिद्धेश्वर-कुरोली गणाचे पंचायत समिती सदस्य श्री. मनोज देशमुख यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातील आरोग्यविषयक अडचणी व समस्या संबंधित भागातील पंचायत समिती सदस्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले.
Jalgaon News: अन्नभेसळीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर! अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
तसेच “माझे गाव – आरोग्यसंपन्न गाव” या कार्यक्रमांतर्गत गावामध्ये बैठक आयोजित करण्यात येईल, त्यावेळी संबंधित पंचायत समिती सदस्यांना आवर्जून निमंत्रित करण्यात यावे, असेही त्यांनी सुचविले. गावातील आरोग्यविषयक समस्या तसेच इतर विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सर्व पंचायत समिती सदस्य कटिबद्ध असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन करत दैनंदिन जीवनात आरोग्याची योग्य काळजी घेण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना व सल्ला दिला.
तसेच सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून आरोग्यसंपन्न गाव घडविण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.सदर कार्यशाळेस जिल्हा परिषद सदस्या श्रीम. मनीषा फडतरे तसेच पंचायत समिती सदस्य शशिकांत रोमन, हनुमंत बोटे, महेश वाघ, मनोज देशमुख व सौ. अनिताताई कोळी यांची विशेष उपस्थिती होती.