Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: दुष्काळी अग्रीम, पीएम किसानचा २४ वा हप्ता व कर्जमुक्तीचे वितरण; शेतकऱ्यांना १११ कोटींचा आधार

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांत शासनाकडून कोट्यवधी रुपये जमा! दुष्काळी अग्रीम, PM Kisan 24th Installment आणि Farmer Loan Waiver Scheme मधून 111 कोटींचा दिलासा मिळाला आहे. सामान्य धानाला 2,441 रुपये आणि अ दर्जाच्या धानाला 2,461 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांना आणखी आधार मिळू शकतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 08, 2026 | 05:18 PM
Gondiya Farmers Financial Assistance Scheme

Gondiya Farmers Financial Assistance Scheme

Follow Us
Follow Us:
  • गोंदिया जिल्ह्यातील 74,910 शेतकऱ्यांच्या खात्यांत दुष्काळी अग्रीममधून 37 कोटी 46 लाख रुपये जमा झाले आहेत.
  • पीएम किसानच्या 24 व्या हप्त्यात 2,16,474 पात्र शेतकऱ्यांना 43 कोटी 29 लाख रुपये मिळाले आहेत.
  • कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 5,169 शेतकऱ्यांना 30 कोटी 30 लाख रुपयांहून जास्त मदत वितरित झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना शासनाच्या विविध आर्थिक मदतीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी मिळालेले प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अग्रीम, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २४ वा हप्ता आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील वितरणातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांत कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. या तीन योजनांमधून आतापर्यंत १११ कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित झाला आहे. त्यातच खरीप पणन हंगाम २०२६-२७ साठी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू झाल्याने शेतकऱ्यांना धान विक्रीचा पर्यायही उपलब्ध झाला आहे.

Gondiya News: गोंदियात दुष्काळाच्या झळा! तिरोड्यात २० हजार हेक्टरवरील पिकांना फटका; ७ तालुक्यात युद्धपातळीवर पंचनामे सुरू

यंदा पावसातील खंड, पाण्याची कमतरता तसेच कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील धान पिकाला फटका बसला. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीच्या निकषांनुसार गोंदिया जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांचा मदतीसाठी समावेश केला. त्यात गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी या तालुक्यांचा समावेश आहे. पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना अग्रीम मदतीचे वितरण सुरू करण्यात आले.

५ नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील ७४ हजार ९१० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ३७ कोटी ४६ लाख रुपये जमा झाले आहेत. ३० ऑक्टोबर २०२६ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता वितरित करण्यात आला. जिल्ह्यातील २ लाख १६ हजार ४७४ पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे एकूण ४३ कोटी २९ लाख ४८ हजार रुपये मिळाले.

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार

दुसऱ्या यादीतील ३० कोटी खात्यांत जमा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात २५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील पाच हजार १६९ शेतकऱ्यांच्या खात्यांत ३० कोटी ३० लाख ३८ हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली. यापैकी चार हजार ३५५ शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार असून त्यांच्या खात्यांत २४ कोटी ५९ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली.

दुसरीकडे, खरीप पणन हंगाम २०२६-२७ साठी ५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत धान विक्री करता येणार आहे. केंद्र शासनाने सामान्य दर्जाच्या धानासाठी प्रतिक्विंटल दोन हजार ४४१ रुपये, तर अ दर्जाच्या धानासाठी दोन हजार ४६१ रुपये आधारभूत किंमत निश्चित केली आहे.

यात गोंदिया तालुक्यातील ४८ हजार ३७६, तिरोडा ३६ हजार ४५८, अर्जुनी मोरगाव २६ हजार ४१३, सडक अर्जुनी २३ हजार ८०८, आमगाव २३ हजार ६७२, गोरेगाव २३ हजार २४१, देवरी १८ हजार १०४ शेतकऱ्यांचा समावेश होता.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांना कोणत्या 3 योजनांमधून 111 कोटी रुपयांची मदत मिळाली?

    Ans: दुष्काळी अग्रीम मदत, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून ही मदत वितरित झाली आहे.

  • Que: पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले?

    Ans: जिल्ह्यातील 2,16,474 पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये मिळाले. एकूण 43 कोटी 29 लाख 48 हजार रुपये वितरित करण्यात आले.

  • Que: गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीसाठी किती आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे?

    Ans: खरीप हंगाम 2026-27 साठी सामान्य धानाला प्रतिक्विंटल 2,441 रुपये आणि अ दर्जाच्या धानाला 2,461 रुपये आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना 31 मार्च 2027 पर्यंत धान विकता येणार आहे.

Web Title: Gondiya farmer financial assistance 111 crore pm kisan auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra

संबंधित बातम्या

Vijay Wadettiwar: धाराशिवमध्ये ४०० जणांच्या बेकायदेशीर भरतीचे रॅकेट? सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप
1

Vijay Wadettiwar: धाराशिवमध्ये ४०० जणांच्या बेकायदेशीर भरतीचे रॅकेट? सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप

Sayaji Shinde: जमिनीच्या रक्षणासाठी एकजूट दाखवा! सयाजी शिंदे यांचे पाली सायडोंगर ग्रामस्थांना आवाहन
2

Sayaji Shinde: जमिनीच्या रक्षणासाठी एकजूट दाखवा! सयाजी शिंदे यांचे पाली सायडोंगर ग्रामस्थांना आवाहन

Anil Mehta Passes Away: मराठी प्रकाशन विश्वावर शोककळा! मेहता पब्लिशिंग हाऊसचे अनिल मेहता काळाच्या पडद्याआड
3

Anil Mehta Passes Away: मराठी प्रकाशन विश्वावर शोककळा! मेहता पब्लिशिंग हाऊसचे अनिल मेहता काळाच्या पडद्याआड

Bhilar School Activity : भिलारमधील हिलरेंज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी कंदील तयार केले
4

Bhilar School Activity : भिलारमधील हिलरेंज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी कंदील तयार केले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.