Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sayaji Shinde: जमिनीच्या रक्षणासाठी एकजूट दाखवा! सयाजी शिंदे यांचे पाली सायडोंगर ग्रामस्थांना आवाहन

Sayaji Shinde: पाली सायडोंगर येथील ग्रामस्थांनी आपल्या जमिनीच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी केले आहे. जमीन वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र राहून संघर्ष करण्याचा संदेश त्यांनी दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 07, 2026 | 04:15 PM
जमिनीच्या रक्षणासाठी एकजूट दाखवा! सयाजी शिंदे यांचे पाली सायडोंगर ग्रामस्थांना आवाहन

जमिनीच्या रक्षणासाठी एकजूट दाखवा! सयाजी शिंदे यांचे पाली सायडोंगर ग्रामस्थांना आवाहन

Follow Us
Follow Us:
  • ‘एकत्र राहून जमीन वाचवायची आहे’
  • पाली सायडोंगर ग्रामस्थांना सयाजी शिंदे यांचे आवाहन
  • सयाजी शिंदे यांचा ग्रामस्थांना एकजुटीचा संदेश
संतोष पेरणे, कर्जत: कर्जतचे पाली सायडोंगर येथे होत असलेल्या हायड्रॉलिक प्रकल्पासाठी तुम्ही जमिनी देऊ नका,एकत्र राहू या बाकी आम्ही बघतो असा विश्वास अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. पाली सायडोंगर येथील शिव मंदिर मध्ये स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधताना असे आवाहन केले.(Sayaji Shinde)

टोरंट प्रकल्पासाठी झालेल्या जंगलतोड विरोधात गेल्या सहा महिन्यापासून खेद व्यक्त करणारे अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे आज जंगलतोड सुरू असलेल्या पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतमधील सायडोंगर येथे आले आहेत. त्यावेळी पाली कोतवाल खलाटी ग्रामपंचायत ग्रामसवर्धन समितीने सयाजी शिंदे यांचे स्वागत केले. त्यावेळी सयाजी शिंदे,कर्जत पर्यावरण बचाव समितीचे ॲड कैलास मोरे,सह्याद्री बचाव समितीचे महेश भारती, तसेच माजी नगराध्यक्ष राजेश लाड आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा

यावेळी ग्रामस्थांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या गावाकडील आठवण सांगत जमिनी देऊ नका असे आवाहन केले.आपण देखील एक प्रकल्पग्रस्त असून 40 वर्षापूर्वी आमची जमीन धरणासाठी घेतली आणि त्यानंतर 30 वर्षे आपल्याला बदली जमीन मिळ लागले आहेत. जमीन कागदावर दिली पण प्रत्यक्षात अजूनही जमीन मिळाली नाही आणि त्यामुळे लहानशा तुकड्यासाठी आपल्या जीवाचा तुकडा देऊ नका असे आवाहन केले. त्याचवेळी आता तुम्हाला 20 लाख मिळतील पण तुमची जमीन करोडोंची असून जमीन आपली आई आहे आपण आपल्या आईला विकणार का? असा सवाल करीत आम्ही धरणाला जागा देऊन शेकलो आहोत आता तुम्हाला सावध करायला आलो आहे असे आवाहन केले.तुम्ही जमिनी देऊ नका आम्ही बाकी प्रकल्प येथून कसा पिटाळून लावायचा हे पाहतो असे सूचित करीत मी तुमच्या सोबत आहे असे आश्वासन दिले.

शिव मंदिर येथे पर्यावरण प्रेमी रोहिदास लोभी हे स्वच्छतेचे दूत गाडगेबाबा बनून आले होते.त्यांनी जमिनी विकू नका,वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशी अनेक उदाहरणे भारुड सादर करून दिली आणि प्रकल्प येथून हटवण्याचा आपला संकल्प यावेळी भारुडातून बोलून दाखवला. सर्व ग्रामस्थांनी यावेळी या भारुड कार्यक्रम सर्वांनी टाळ्यांची साथ देत सहभाग घेतला.

Karjat Saidongar Deforestation : टोरंट कंपनीकडून भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीला कोट्यवधींचा निधी! प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Web Title: Sayaji shinde appeals pali saidongar villagers to unite and save land sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • entertainment
  • maharashtra
  • Sayaji Shinde

संबंधित बातम्या

Anil Mehta Passes Away: मराठी प्रकाशन विश्वावर शोककळा! मेहता पब्लिशिंग हाऊसचे अनिल मेहता काळाच्या पडद्याआड
1

Anil Mehta Passes Away: मराठी प्रकाशन विश्वावर शोककळा! मेहता पब्लिशिंग हाऊसचे अनिल मेहता काळाच्या पडद्याआड

Bhilar School Activity : भिलारमधील हिलरेंज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी कंदील तयार केले
2

Bhilar School Activity : भिलारमधील हिलरेंज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी कंदील तयार केले

Ramayana Movie: २४ कॅरेट सोन्याचं रावणाचं सिंहासन अन् पुष्पक विमानासाठी सहा वर्षांची मेहनत; ‘रामायण’ची भव्य तयारी
3

Ramayana Movie: २४ कॅरेट सोन्याचं रावणाचं सिंहासन अन् पुष्पक विमानासाठी सहा वर्षांची मेहनत; ‘रामायण’ची भव्य तयारी

Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराला धमकीचा मेल; ‘जलसा’ बंगल्याची पोलिसांकडून तपासणी
4

Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराला धमकीचा मेल; ‘जलसा’ बंगल्याची पोलिसांकडून तपासणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.