Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anil Mehta Passes Away: मराठी प्रकाशन विश्वावर शोककळा! मेहता पब्लिशिंग हाऊसचे अनिल मेहता काळाच्या पडद्याआड

Anil Mehta Passes Away: मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांचे कोल्हापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. १९७६ मध्ये त्यांनी मेहता पब्लिशिंग हाऊसची स्थापना केली होती. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 07, 2026 | 12:41 PM
मराठी प्रकाशन विश्वावर शोककळा! मेहता पब्लिशिंग हाऊसचे अनिल मेहता काळाच्या पडद्याआड

मराठी प्रकाशन विश्वावर शोककळा! मेहता पब्लिशिंग हाऊसचे अनिल मेहता काळाच्या पडद्याआड

Follow Us
Follow Us:
  • मेहता प्रकाशनाचे संस्थापक अनिल मेहता यांचे निधन
  • वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • १९७६ मध्ये केली होती मेहता प्रकाशनाची स्थापना
Anil Mehta Passes Away: मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे संस्थापक अनिल मेहता यांचे कोल्हापूर येथे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य आणि प्रकाशन विश्वात शोककळा पसरली आहे. (Anil Mehta Passes Away)

१९७६ मध्ये केली होती मेहता प्रकाशनाची स्थापना

अनिल मेहता यांनी १९७६ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेची स्थापना केली होती. मराठी पुस्तक प्रकाशन क्षेत्रात या संस्थेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. साहित्य, कथा, कादंबऱ्या, वैचारिक लेखन आणि विविध विषयांवरील पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यात मेहता प्रकाशनाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Heart Attack News: दिवाळी पहाट मैफलीत वादन करताना आला तीव्र हृदयविकाराचा झटका; प्रसिद्ध मृदंगवादकांच्या निधनाने संगीत जगात शोककळा!

मराठी साहित्यविश्वात महत्त्वाचे योगदान

पुस्तक प्रकाशन क्षेत्रात काम करताना अनिल मेहता यांनी मराठी वाचक आणि लेखक यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी योगदान दिले. नव्या लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, दर्जेदार साहित्य प्रकाशित करणे आणि वाचनसंस्कृतीला चालना देणे, अशा विविध माध्यमांतून मेहता प्रकाशनाने आपला ठसा उमटवला.

गेल्या अनेक दशकांपासून मेहता पब्लिशिंग हाऊस हे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचे बनले आहे. त्यामुळे संस्थेचे संस्थापक अनिल मेहता यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातील एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत.

कोल्हापुरात निधन; साहित्य क्षेत्रातून हळहळ

अनिल मेहता यांचे कोल्हापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mumbai News: राणीबागेतील पेंग्विन जाणार म्हैसूरला? श्री चामराजेंद्र प्राणिसंग्रहालयाच्या मंडळाकडून पेंग्विन कक्षाची पाहणी

बातमी अपडेट होत आहे… 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अनिल मेहता यांचे निधन कधी आणि कुठे झाले?

    Ans: मेहता प्रकाशनाचे संस्थापक अनिल मेहता यांचे कोल्हापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

  • Que: अनिल मेहता यांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय किती होते?

    Ans: अनिल मेहता हे ८६ वर्षांचे होते.

  • Que: मेहता पब्लिशिंग हाऊसची स्थापना कधी झाली?

    Ans: अनिल मेहता यांनी १९७६ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेची स्थापना केली होती.

Web Title: Mehta publishing house founder anil mehta passes away at 86 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra

संबंधित बातम्या

Kolhapur Gokul Milk Politics: कोल्हापूर तुमच्या अहंकाराची मस्ती उतरवणार!; सतेज पाटलांकडून आंदोलनाची घोषणा
1

Kolhapur Gokul Milk Politics: कोल्हापूर तुमच्या अहंकाराची मस्ती उतरवणार!; सतेज पाटलांकडून आंदोलनाची घोषणा

Bhilar School Activity : भिलारमधील हिलरेंज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी कंदील तयार केले
2

Bhilar School Activity : भिलारमधील हिलरेंज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी कंदील तयार केले

Kolhapur : ऊस दर आंदोलनावर यशस्वी तोडगा, ३९०० रुपये एकरकमी उचल
3

Kolhapur : ऊस दर आंदोलनावर यशस्वी तोडगा, ३९०० रुपये एकरकमी उचल

आंबेगावच्या आरोग्य यंत्रणेला बळ, तांबडेमळा रुग्णालयासाठी 40 कोटींचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटलांची माहिती
4

आंबेगावच्या आरोग्य यंत्रणेला बळ, तांबडेमळा रुग्णालयासाठी 40 कोटींचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटलांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.