Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Update: कोकणात नितेश राणे विरूद्ध निलेश राणे- दीपक केसरकरांची प्रतिष्ठा पणाला

मालवणमध्ये शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी ‘स्ट्रिंग ऑपरेशन’ करत भाजपचे पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या वाहनातून रोकड जप्त केल्याची कारवाई केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 21, 2025 | 10:33 AM
Maharashtra Local Body Election Result 2025

Maharashtra Local Body Election Result 2025

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठीची मतमोजणी आज
  • तीन नगरपंचायतींमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने या ठिकाणी मतमोजणी होणार नाही
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठीची मतमोजणी आज, 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. दुपारपर्यंत बहुतांश निकाल हाती येण्याची शक्यता असून, या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जामनेर, अंजनगर आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतींमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने या ठिकाणी मतमोजणी होणार नाही. त्यामुळे आज एकूण 287 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतमोजणी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

या निवडणुकांमध्ये केवळ महायुतीच नव्हे, तर महाविकास आघाडीतील घटक पक्षही अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे आजच्या निकालांमधून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार असून, निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, तळकोकणातील कणकवली नगरपंचायत, मालवण नगरपरिषद, वेंगुर्ले नगरपरिषद आणि सावंतवाडी नगरपरिषद येथे पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार असून, निवडणूक आयोगाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

Maharashtra Nagar Palika–Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: राज्यातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींची

या निवडणुकांत भाजपने जिल्ह्यात स्वबळाचा नारा देत निवडणूक लढवली असल्याने पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांची कसोटी लागली आहे. मालवणमध्ये आमदार निलेश राणे, तर सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथे दीपक केसरकर यांचीही प्रतिष्ठा या निकालांवर अवलंबून आहे.

कोकणात कुठे कुठे राडे झाले?

मालवण : कोकणातील नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकांदरम्यान काही ठिकाणी राजकीय वाद आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या. मालवणमध्ये शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी ‘स्ट्रिंग ऑपरेशन’ करत भाजपचे पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या वाहनातून रोकड जप्त केल्याची कारवाई केली. यावेळी आमदार निलेश राणे यांनी स्वतः मालवण पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचंही समोर आलं.

याचदरम्यान भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत ते खोटे असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व घडामोडींमुळे मालवणमध्ये शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, यापूर्वी मालवण नगरपरिषदेत उबाठा गटाचा नगराध्यक्ष असल्याने ही जागा टिकवण्याचे आव्हान उबाठा गटासमोर असून, पर्यायाने माजी आमदार वैभव नाईक यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. कोकणातील या राजकीय संघर्षामुळे Konkan Nagarparishad–Nagarpanchayat Election Result 2025 कडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, आजच्या निकालांतून या वादांचा परिणाम स्पष्ट होणार आहे.

Jeffery Epstein Files : असा मिळायचा अल्पवयीन मुलींना ‘भाव’ ; एक रशियन तब्बल ‘इतक्या’ डॉलर्सला

सिंधुदुर्ग- कणकवलीमध्ये नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजविरोधात असलेल्या सर्व पक्षांच्या कार्यककर्त्यांकडून नितेश राणेंना घेरण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना कऱण्यात आली. नितसे राणेंनी प्रतिनिधीत्व केल्याने राणे विरूद्ध राणे असा राजकीय संघर्ष निर्णाण झाली. त्यामुळे नितेश राणेंची प्रतिष्ठा पणाला लागला आहे.

सिंधुदुर्ग- शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी नगरपरिषद आणि वेंगुर्ले नगरपरिषदमध्ये राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सावंतवाडी हा दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यावेळी भाजपने सावंतवाडीत थेट घेराबंदी करत निवडणूक लढवली आहे. तसेच वेंगुर्ले नगरपरिषद ही केसरकर यांच्या मतदारसंघात येत असल्याने या दोन्ही ठिकाणी त्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, यापूर्वीही सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता होती. त्यामुळे यावेळी भाजप आपली सत्ता कायम राखतो की केसरकर गट आपला प्रभाव टिकवतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

– सावंतवाडी नगरपरिषद
सावंतवाडी हा दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यावेळी सर्व प्रमुख पक्षांनी ताकद पणाला लावल्याने येथे चुरशीची लढत होत आहे.

श्रद्धा सावंत–भोसले (भाजप)

नीता सावंत–कविटकर (शिवसेना – शिंदे गट)

सीमा मटकर (उबाठा)

साक्षी वंजारी (काँग्रेस)

– कणकवली नगरपरिषद (Kankavali Nagar Parishad)

कणकवलीत भाजप आणि उबाठा–शिंदे गटाच्या शहर विकास आघाडीमध्ये थेट सामना होत असून, येथेही प्रतिष्ठेची लढत रंगली आहे.

समीर नलावडे (भाजप)

संदेश पारकर (उबाठा व शिंदे शिवसेना शहर विकास आघाडी)

– मालवण नगरपरिषद (Malvan Nagar Parishad) 

मालवणमध्ये राणे विरुद्ध राणे असा थेट सामना पाहायला मिळत असून, ही लढत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

शिल्पा खोत (भाजप)

ममता वराडकर (शिवसेना – शिंदे गट)

पूजा करलकर (उबाठा)

 

 

 

Web Title: Nagar parishad nagar panchayat election result 2025 update in konkan the prestige of nitesh rane nilesh rane and deepak kesarkar is at stake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 10:24 AM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • Maharashtra Election Results
  • nagar panchayat elections
  • nagar parishad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.