Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AIIMS Nagpur : शस्त्रक्रियेसाठी तीन-तीन महिने वाट; रुग्णांच्या वाढल्या फेऱ्या..

AIIMS Nagpur : नागपूर येथील एम्स रुग्णालयात हाडांच्या (ऑर्थोपेडिक) शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना तब्बल तीन महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याचे समोर आले आहे. शस्त्रक्रियेची तारीख मिळण्यात होणारा विलंब आणि वारंवार रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये नाराजी आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 02, 2026 | 03:25 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • ९२० खाटांचे रुग्णालय
  • ५० खाटा आपत्कालीन विभागात
  • प्रतीक्षा यादी कमी करण्याची गरज
  • सतत चोकशी करावी लागते
AIIMS Nagpur : ५४ वर्षीय हेमंत यांचा जून महिन्यात अपघात झाला. सुरुवातीला त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले; मात्र आर्थिक अडचणीमुळे पुढील उपचारांसाठी ते एम्समध्ये गेले. डॉक्टरांनी पायाचे हाड जोडण्यासाठी शत्रक्रियेचा सल्ला दिला. त्यासाठी आवश्यक सर्व तपासण्याही पूर्ण झाल्या. मात्र, हेमंत आतापर्यंत सुमारे १० ते १२ वेळा रुग्णालयात जाऊन चौकशी करून आले आहेत. प्रत्येक वेळी त्यांना एकच उत्तर मिळते की, सध्या खाट उपलब्ध नाही. ही वेदना केवळ हेमंत यांची नाही, तर अशा अनेक रुग्णांना वेदना सहन करत जगावे लागत आहे. एम्समध्ये खाटांची कमतरता आणि रुग्णांची वाढती संख्या यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

Nagpur News : विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीचा वाद आता हायकोर्टात ! राज्यसरकार सह प्रतिवादींना नोटीस .

अस्थिरोग विभागात शस्त्रक्रियेसाठी सुमारे ३ ते ४ महिन्यांची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जाते. रुग्ण वारंवार चौकशीसाठी येतात; मात्र त्यांना प्रतीक्षा करण्यास सांगितले जाते. म्हणजेच वेदना सहन करत राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही. एम्समध्ये एकूण ९२० खाटा असून त्यापैकी सुमारे ५० खाटा आपत्कालीन विभागासाठी आहेत. अस्थिरोग विभागात सुमारे ४० खाटा असून त्यात २० पुरुष आणि २० महिला रुग्णांसाठी राखीव आहेत. विभागात १ प्राध्यापक, २ सहयोगी प्राध्यापक, ३ सहाय्यक प्राध्यापक आणि ६
वरिष्ठ निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. याशिवाय पदव्युत्तर विद्यार्थीही आहेत. म्हणजे मनुष्यबळाची कमतरता नाही. तरीही शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

प्रतीक्षा यादी कमी करण्याची गरज

प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. वेळेत शस्त्रक्रिया न झाल्यास जखमेचा संसर्ग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत ज्या शस्त्रक्रियेस २ तास लागले असते, त्यासाठी पुढे ४ ते ५ तास लागू शकतात. यामुळे रुग्णाच्या बरे होण्याचाही कालावधी वाढतो.

Nagpur : भर पावसात वेकोलिच्या खाणीत आग; नेमकं कारण काय?

स्वतंत्र हॉस्पिटल प्रशासन विभाग

एम्समध्ये स्वतंत्र हॉस्पिटल प्रशासन विभाग कार्यरत आहे. या विभागाचे काम म्हणजे प्रतीक्षा यादीनुसार रुग्णांना प्राधान्य देणे, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांवर लक्ष ठेवणे तसेच प्रतीक्षा यादीतील रुग्णांशी दूरध्वनीवर संपर्क साधून शस्त्रक्रियेची माहिती देणे. मात्र, हेमंत यांच्यासारखे अनेक रुग्ण आहेत, ज्यांना वारंवार रुग्णालयाच्या फेऱ्या मारूनही कधीही दूरध्वनीवर माहिती दिली जात नाही. येथे केवळ नागपूर किंवा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर इतर राज्यांतील रुग्णही उपचारासाठी येतात. रुग्णांना रुग्णालयात येण्यासाठी नातेवाईकांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे रुग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Aiims nagpur three month wait for surgery patients forced to make repeated visits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • AIIMS
  • Healthcare
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !
1

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
2

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च
3

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
4

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.