Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री; कापूस आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी; मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही.

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव रिठी आणि कोहळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेताच्या बांधावर जाऊन कापूस व तूर पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना उर्वरित मदत देण्यासह ऑफलाइन नोंदणी आणि धान्याचा लाभ देण्याचे आश्वासन दिले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 09, 2026 | 07:37 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • सोनेगावमध्ये कापूस पिकाची पाहणी; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या
  • कोहळीतील शेतकऱ्यांना दिलासा; उर्वरित मदतही खात्यात जमा होणार
  • ऑनलाइनऐवजी ऑफलाइन नोंदणीची सुविधा; रेशनपासून वंचित शेतकऱ्यांनाही लाभ
Nagpur News : नागपूर जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

कळमेश्वर तालुक्यातील सोनेगाव रिठी आणि कोहळी येथे त्यांनी कापूस व तूर पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासोबतच उर्वरित अनुदानही खात्यात जमा केले जाईल. शासन संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

सोनेगावमध्ये कापूस पिकाची पाहणी; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोनेगाव येथील शेतकरी दिलीप सरोदे यांच्या शेताला भेट देऊन कापूस पिकाची पाहणी केली. पावसाअभावी कापसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. अनेक ठिकाणी कापसाची बोंडेही फुटली नसल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावेळी दिलीप सरोदे यांनी दुष्काळासोबतच वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याची व्यथा मांडली. पिकांच्या संरक्षणासाठी सौर कुंपण उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर सौर कुंपणाची योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Nagpur News : शेतकऱ्यांच्या अनुदानावर बँकांचा डोळा नको; मदतीची रक्कम कर्ज खात्यात वळती केल्यास कारवाईचा इशारा

कोहळीतील शेतकऱ्यांना दिलासा; उर्वरित मदतही खात्यात जमा होणार

कळमेश्वर तालुक्यातील कोहळी येथे मुख्यमंत्री बाबुराव काळे यांच्या शेतात पोहोचले. त्यांनी कापूस आणि तूर पिकांची पाहणी करून नुकसानीची माहिती घेतली. दीर्घकाळ पाऊस न पडल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे. यावेळी शेतकऱ्यांना शासनाकडून पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यात आली असून उर्वरित मदतही थेट बँक खात्यात जमा केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. दुष्काळामुळे खचून न जाता शेतकऱ्यांनी धीर धरावा, शासन आवश्यक ती मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

Nagpur Sport : बॅडमिंटनमध्ये नागपूरच्या खेळाडूंनी पटकावली ६ पदके

ऑनलाइनऐवजी ऑफलाइन नोंदणीची सुविधा; रेशनपासून वंचित शेतकऱ्यांनाही लाभ

दुष्काळी मदतीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक असली तरी सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीऐवजी ऑफलाइन नोंदणी करण्याची सवलत देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली. याशिवाय दुष्काळी परिस्थितीत धान्याचा पुरवठा उपलब्ध होत असला तरी शिधापत्रिका नसलेल्या शेतकऱ्यांनाही प्राधान्याने नोंदणी करून धान्याचा लाभ द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.

या पाहणी दौऱ्यात आमदार चरणसिंग ठाकूर, राजीव पोतदार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Web Title: Nagpur farmer relief fadnavis crop inspection cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • drought news
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : तर्री पोह्यांचा नाश्ता, शेतकरी कुटुंबात भाऊबीज मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकरी कुटुंबात दिवाळी!
1

Nagpur News : तर्री पोह्यांचा नाश्ता, शेतकरी कुटुंबात भाऊबीज मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकरी कुटुंबात दिवाळी!

Pune Metro News : पुणे मेट्रो लाइन ३ साठी सीमेन्सचे अत्याधुनिक तंत्रज्ञान; हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी हो
2

Pune Metro News : पुणे मेट्रो लाइन ३ साठी सीमेन्सचे अत्याधुनिक तंत्रज्ञान; हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी हो

World Finance News :शांत बसतील ते ट्रम्प कसले; प्रशासनाचा ‘परप फ्युचर्स’ला हिरवा कंदील; आर्थिक बाजारात संघर्षाची चिन्हे
3

World Finance News :शांत बसतील ते ट्रम्प कसले; प्रशासनाचा ‘परप फ्युचर्स’ला हिरवा कंदील; आर्थिक बाजारात संघर्षाची चिन्हे

लंडनच्या झगमगाटात Kartik Aaryanला आली घरच्या दिवाळीची आठवण; पोस्टमधून व्यक्त केल्या भावना
4

लंडनच्या झगमगाटात Kartik Aaryanला आली घरच्या दिवाळीची आठवण; पोस्टमधून व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.