Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur: दारु पिऊन दुचाकीने स्टंटबाजी, दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन्…

Nagpur Accident : उड्डाणपुलावर शर्यत खेळताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 06, 2024 | 04:23 PM
Nagpur: दारु पिऊन दुचाकीने स्टंटबाजी, दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन्… (फोटो सौजन्य-X)

Nagpur: दारु पिऊन दुचाकीने स्टंटबाजी, दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन्… (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Nagpur Accident News In Marathi: दारू पिऊन दुचाकीवर स्टंटबाजी करणं दोन युवकांचा जीवावर बेतले. उड्डाणपुलावर शर्यत खेळताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. ही घटना नागपुरमधील असून या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरमधील नरेंद्र नगरातील उड्डाणपुलावर गुरुवारी (5 डिसेंबर) पहाटेच्या वेळी दोन तरुणांमध्ये स्टंटबाजीचा खेळ सुरु होता. ही स्टंटबाजी सुरु असतानाचा हा अपघात घडला. आदर्श रमेश समर्थ (24, जुना बाबुलखेडा, पार्वतीनगर) आणि आदित्य राकेश मेश्राम (18, किराणापूर, हुडकेश्वर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन विश्वकर्मा (19, भगवाननगर), आदित्य मेश्राम आणि आदर्श समर्थ हे तिघे यांचे मित्र आहेत. तिघेही बेरोजगार असून दारू पिण्याचे व्यसन आहे. आदर्शवर पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. आदर्शकडे पल्सर दुचाकीला वेगात स्पर्धा करण्याची सवय आहे. तो नेहमी उड्डाणपुलावर स्टंटबाजी करण्याच्या सवयीचा होता. आदित्य आणि आदर्श दोघे पल्सर या दुचाकीने तर अर्जून हा अॅक्टीव्हाने गुरुवारी पहाटे दोन वाजता फिरायला निघाले.

पैसे घेऊनही घरांचा ताबा देण्यास टाळाटाळ करणं बिल्डरला भोवलं; रिअल इस्टेट कंपन्यांकडून 200 कोटी वसूल

ठरल्याप्रमाणे या तिघांना स्टंटबाजी करताना फोटो आणि व्हिडीओ शूट करायचं होतं. त्यामुळे तिघेही दुचाकीने पुलावर पोहोचले. यामध्ये आदर्श हा दारुच्या नशेत होता. त्याने त्याने अर्जुनाला स्टंट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शूट करायला सांगितले. ठरल्यानुसार, आदर्श आणि आदित्य पल्सरवर बसले. आदर्शने सुसाट दुचकी चालवून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र उड्डाणापुलाच्या मध्यभागी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी दुभाजकाला धडकली. या धडकेत दोघेही 200 मीटरपर्यंत घासत गेले. याचदरम्यान त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. मोबाईलवर शूट करणाऱ्या अर्जुनने धाव घेतली. त्यानंतर उड्डाणपुलावरुन जाणाऱ्या एका वाहनचालकाला थांबवले. दरम्यान, प्रतापनगरचे पोलिस उपनिरीक्षक सतीश भोळे पाठकासह तेथे पोहोचले.

दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांच्याही डोक्याला मार लागल्यामुळे त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळपर्यंत उपचार सुरु होते. मात्र . उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. प्रतापनगर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

अपघात सीसीटीव्हीत कैद

हे तिन्ही मित्र नेहमी नरेंद्रनगर उड्डाणपुलावर स्टंटबाजीसाठी जात होते. चहा पिण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने सांगून तिघेही घराबाहेर पडायचे. आदर्श समर्थ हा सुसाटने स्टंट ड्रायव्हिंग करायचा. त्याने ‘झिकझॅक’ प्रकारे दुचाकी चालविल्यामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता की आदर्श आणि आदित्य दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हा सर्व प्रकार एका इमारतीवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत.

तसेच हेल्मेट घालण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान ही घटना घडली. दुर्दैवाने हा अपघात शहरातील रस्ते अपघातांच्या मोठ्या मालिकेचा एक भाग आहे, ज्यात अवघ्या २४ तासांत दोन ज्येष्ठ नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या शपथविधीपूर्वीच आता हिवाळी अधिवेशनाची तारीख आली समोर, फक्त…

Web Title: Drunk trucker mows down guard directing traffic at pardi flyover in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 04:23 PM

Topics:  

  • Nagpur

संबंधित बातम्या

Nagpur Crime: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीवर हातोड्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटक
1

Nagpur Crime: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीवर हातोड्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटक

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 
2

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून
3

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून

Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल
4

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.