
Nagpur
Nagpur महापालिकेला मिळणार ८२ कोटी रुपयांचे अनुदान; तब्बल 4 वर्षांनी…
मिळालेल्या माहितीनुसार, भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. जो काढून त्यावर प्रक्रिया केली जात होती. शनिवारी दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अचानक आग लागली. प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते यांनी तातडीने सात अग्निशमन वाहन डम्पिंग यार्डकडे रवाना केले. आग विझविल्यानंतरही धूर निघत असल्याने पुढील २४ तासांसाठी एक अग्निशमन वाहन घटनास्थळीच तैनात ठेवला आहे.
अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी आणि मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. मागील वर्षासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पंत यांनी दिले. प्राथमिक माहितीनुसार, जुना कचरा साचल्यामुळे त्यामधील ज्वलनशील वायूमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
डोहात बुडून मुलाचा मृत्यू! ठाणेदारांचे प्रयत्न व्यर्थ; कपिलेश्वर मंदिर परिसरातील घटना
मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आंघोळीसाठी डोहात उतरलेला यश भोलाशंकर राठोड (१७, रा. कळमना) या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना केळवद ग्रामीण पोलिस हद्दीतील कपिलेश्वर संगमावर शनिवारी दुपारी १.३० वाजता घडली. यावेळी केळवदचे ठाणेदार आशिष सिंह ठाकूर आणि मेजर सुधीर यादगिरे परिसरात गस्तीवर होते. ते दृष्य बघून ठाकूर यांनी डोहात उडी घेतली आणि वशला चाहेर काढले. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. यशच्या मृत्यूने आई आणि बहिणीला मोठा धक्का बसला आहे. प्राप्त माहितीनुसार, कळमना परिसरातील ३५ जण शनिवारी कपिलेश्वर मंदिर परिसरात पिकनिकसाठी गेले होते. यश आई आणि बहीण स्वातीसह गेला होता. सर्वांनी मंदिरात कपिलेश्वराचे दर्शन घेतले, त्यानंतर परिसरात असलेल्या डोहाजवळ पिकनिकचा आनंद घेत होते. यशने पाण्यात उडी घेताच गटांगळ्या खाऊ लागला, हे पाहून नागरिकांनी आरडाओरड सुरू केली.
हरी महाराज व कुटुंबातील महिलांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले. परंतु, कोणालाही पोहता येत नसल्याने त्यांना अपयश आले. लगेच काही जणांनी हितज्योती आधार फाऊंडेशनचे हितेश बन्सोड यांना माहिती दिली. त्यांनी केळवद पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, ठाणेदार गस्तीवर असल्याने त्यांनी स्वतः स्थळ गाडून यशला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, यश दगावला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Ans: नागपूरच्या भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये शनिवारी दुपारी ३.२३ वाजता.
Ans: ७ अग्निशमन वाहनांनी पाण्याचा मारा केला; २४ तासांसाठी एक बंब तैनात.
Ans: साचलेल्या जुन्या कचऱ्यातील ज्वलनशील वायूमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज.