
crime (फोटो सौजन्य: social media)
Hingoli Crime: 69 वर्षीय नराधमाने चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार, आधी चॉकलेट आणि पैसे दिले नंतर…
काही तस्कर ओडिशातून गांजाची खेप घेऊन नागपूरकडे येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीच्या आधारावर युनिट-५च्या पथकाने भंडारा-नागपूर महामार्गावर संशयित वाहनांवर लक्ष ठेवले. शुक्रवारी पहाटे कापसी बुर्ज गावासमोर सिल्व्हर रंगाच्या ७ सीटर कारला थांबवून झडती घेतली. प्लॅस्टिकच्या पोत्यात एकूण ५ किलो गांजा आढळला. ज्याचे बाजार मूल्य जवळपास १.२५ लाख रुपये आहे. तसेच गांजा ठेवण्यासाठी वापरलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, रोकड, ३ मोबाईल आणि तस्करीसाठी वापरलेली कार जप्त केली.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी सांगितले, त्यांनी हा गांजा ओडिशातील काटाबांजी येथील ‘रविभाई’ नावाच्या तस्कराकडून खरेदी केला होता. या प्रकरणातील मुख्य पुरवठादार ‘रवि भाई’चा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना केली आहेत. नागपूर शहरात गांजाची विक्री कुठे आणि कोणाला होणार होती, याचा तपास सुरू आहे. पारडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
ओयो हॉटेलमधील आरोपी होता फरार! आरोपी सौरभला भोपाळमधन अटक
कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील फेटरी येधील ओयो हटिलमध्ये २२ जानेवारी रोजी घडलेल्या तरुणीच्या खून प्रकरणातील फरार आरोपी सौरभऊर्फ बिट्ट जामगडे (२५, रा. आष्टी, ता. कळमेश्वर) याला भोपाळमध्ये अटक केली. त्याचा शोध खून प्रकरण घेण्यासाठी चार पथके गठित केली होती. प्राथमिक तपासात आरोपी पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. नंतर बिहारमध्ये पसार असल्याचे समजले. गुरुवारी आरोपी मौदा तालुक्यातील महालगाव परिसरात असल्याची खात्री मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. तेलंगणा एक्सप्रेसने नागपूरहून दिल्लीकडे प्रवास करीत असल्याची माहिती मिळताच भोपाळ रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. कळमेश्वर पोलिसांनी आरोपीला अटक केली केली. न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; गुन्हेगारी रोखण्यासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Ans: ओडिशातील काटाबांजी येथील ‘रविभाई’ नावाच्या तस्कराकडून.
Ans: 5 किलो गांजा व कार, मोबाईल, रोकड असा सुमारे 6.50 लाखांचा मुद्देमाल.
Ans: पारडी पोलिस ठाणे व गुन्हे शाखा NDPS कायद्यान्वये पुढील तपास करत आहेत.