Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime :नागपुरात इंदूरच्या ‘लाला कंपनी’चा शिरकाव?

सोशल मीडियावर गुन्हेगारांचे 'भाईजान' म्हणून उदात्तीकरण; पोलिस यंत्रणा अनभिज्ञ . याला बळी पडत आहेत नागपुरातील अल्पवयीन मुलं .एका भाईजानच्या अस्तानंतर दुसऱ्या भाईजान चा जन्म होत राहतोय . नागपुरातील भाईगिरी कधी संपुष्टात येणार अश्या चर्चा लोकांमधून येत आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 27, 2026 | 03:20 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

▶ अभिषेक तिवारी। नवराष्ट्र नागपूर. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाच बाहेरील राज्यातील गुन्हेगारी टोळ्यांनी नागपुरात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरच्च्या कुख्यात ‘लाला कंपनी’ ने नागपुरात जाळे विस्तारण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या हालचालींबाबत नागपूर पोलिस यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या टोळीने नागपुरात संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. तरुण वर्गामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून टोळीचे आकर्षण वाढत आहे. १७ ते २१ वर्षे वयोगटांतील तरुण टोळीचे ‘फालोअर्स’ असल्याचे सांगितले जाते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना तरुणांकडून मिळणारे समर्थन आणि समाजमाध्यमांवरील उदात्तीकरण ही वाढती समस्या बनत आहे. गुन्हेगारांचे सोशल मीडियावर होणारे उदात्तीकरण हे पोलिसांसाठी नवीन आव्हान ठरत आहे.

Nagpur : अकरावीवर SIR चा फटका , विद्यार्थ्यांचे नुकसान ..

महाराष्ट्रात विस्ताराचे कारण काय?
इंदूरमधील ‘लाला कंपनी’ ही चर्चित गुन्हेगारी टोळी म्हणून ओळखली जाते. टोळीचा प्रमुख सलमान लाला ऊर्फ शाहनवाज हा १३ वर्षांचा असतानाच गन्हेगारीत सक्रिय झाला होता. २८ चा होतपर्यंत त्याच्यावर खून, खंडणी, अमली पदार्थांची तस्करी आणि बलात्कारासह ३२ गुन्हे दाखल झाले. मागीलवर्षी इंदूर पोलिसांनी त्याच्यावर कारवाईची मोहीम राबवली होती. त्याचे काही साथीदार पकडले गेले. मात्र, सलमान लाला फरार झाला. दुसऱ्या दिवशी इंदूर-भोपाळ मार्गावर त्याचा मृतदेह पाण्याने भरलेल्या खड्धात आढळला. त्याच्या मृत्यूबाबतही संशय व्यक्त केला होता.

सलमान लालाच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ शादाब लालाने टोळीची सूत्रे हाती घेतल्याचे सांगितले जाते. त्याचा निकटवर्तीय गुलफाम अन्सारी हा छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया येथील रहिवासी आहे. ही टोळी शस्त्रांच्या तस्करीत सक्रिय असल्याचे सांगितले जाते. तसेच काही वर्षांत अमली पदार्थांच्या विक्रीचे जाळेही वाढवल्याची माहिती आहे. नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये शस्त्रांची विक्री तसेच अमली पदार्थांच्या व्यवहारात या टोळीचा सहभाग असल्याची चर्चा आहे. अशात प्रश्न निर्माण होतो की, मध्यप्रदेशातील गुन्हेगारांची ही टोळी नागपूरसह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये सक्रिय होण्यामागचे कारण काय?

NagpurCity: लीजसाठी व्हीएचए ची आयुक्तांकडे धाव,अहवालावर प्रश्नचिन्ह..

स्थानिक गुन्हेगारांमध्ये अस्वस्थता
‘लाला कंपनी’च्या वाढत्या हालचालीमुळे नागपुरातील स्थानिक गुन्हेगारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाल्याचे समजते. सुरुवातीला बाहेरील टोळीच्या हालचालींकडे दुर्लक्ष केले जात होते. आता या टोळीभोवती वाढणारी गर्दी आणि प्रभावामुळे स्थानिक गुन्हेगारी वर्तुळात नाराजी निर्माण झाल्याची माहिती आहे. काही गुन्हेगारांमध्ये आर्थिक व्यवहारांवरून वाद निर्माण झाल्याचीही चर्चा आहे. भविष्यात या वादाचे रूपांतर संघर्षांत झाल्यास शहराच्या कायदा-सुव्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

Web Title: Nagpur crime has indores lala company made inroads into nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Crime in Nagpur
  • Nagpur Police

संबंधित बातम्या

Nagpur Crime : एकाच फ्लॅटची दोघांना विक्री ,सव्वा कोटींचा गंडा
1

Nagpur Crime : एकाच फ्लॅटची दोघांना विक्री ,सव्वा कोटींचा गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.