Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Nagpur News : नागपुरात मोबाईल टॉवरवर चढलेल्या मोनूमुळे काही काळ ‘शोले’ चित्रपटातील वीरूच्या प्रसंगाची आठवण झाली. मोनूच्या या ‘वीरूगिरी’मुळे परिसरात खळबळ उडाली असून, त्याला खाली उतरवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 16, 2026 | 02:46 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • शोले ची आठवण
  • भाषा ठरली बचावाची किल्ली
  • मित्र सोडून गेल्याने निराश ?
Nagpur News : आमदार निवास परिसरातील चौकात मंगळवारी सकाळी ‘शोले’ चित्रपटातील वीरूच्या प्रसंगाची आठवण करून देणारा थरार रंगला. मोबाईल नेटवर्कच्या टॉवरवर चढलेल्या तरुणाने खाली उतरण्यास नकार दिल्याने पोलिस आणि अग्निशमन जवानांची तब्बल अडीच तास तारांबळ उडाली. किशोर ऊर्फ मोनू बरसन सिन्हा (२७, रा. बोरतारा, ता. गुरूर, जि. बालोद, छत्तीसगड) असे वीरूगिरी करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. रात्री तो पोलिस ठाण्यातून सर्वासमोरून फरार झाला, है विशेष

शोले ची आठवण

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ११.३० ते १२ वाजता मोनू आमदार निवास परिसरात आला. काही वेळ इकडे-तिकडे फिरल्यानंतर तो चौकातील मोबाईल नेटवर्क टॉवरवर चढला. काही वेळात ही बाब नागरिकांच्या लक्षात आली आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. माहिती मिळताच सीताबडी आणि अंबाझरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.

महापालिकेच्या अग्निशमन विभागालाही पाचारण केले. अग्निशमन दलाचे जवान ‘टर्न टेबल वाहनासह घटनास्थळी पोहोचले. जवानांनी शिडीच्या लायडर’ (टीटीएल) मदतीने टॉवरपर्यंत पोहोचून मोनूला खाली येण्याची विनंती केली. मात्र, मोनू काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. जवान त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसताच तो आणखी वर चढत होता.

जवळपास तासभर समजूत काढूनही तो खाली आला नाही. उलट, त्याने जवानांकडे पाणी आणि खाण्यासाठी मागणी केली. जवानांनी त्याला पाण्याची बाटली आणि समोसे दिले. मात्र, त्याचा हट्ट कायम राहिला. जवानांनी हात पकडून त्याला खाली आणण्याचाही प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला.

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’

भाषा ठरली बचावाची किल्ली

मोनूची भाषा समजण्यात अडचण येत असल्याने जवानांनी वेगळी शक्कल लढवली. छत्तीसगडी भाषा येणाऱ्या मजुराला जवानांसोबत टॉवरवर पाठवले. त्या मजुराने मोनूला बोलण्यात गुंतवून ठेवले. याच संधीचा फायदा घेत जवानाने टॉवरच्या पाय-यांवरून तर दुसन्याने शिडीच्या मागील बाजूने गुपचूप वर चढत त्याच्याजवळ पोहोचले. मोनू बोलण्यात गुंग असतानाच दोन्ही जवानांनी त्याला पकडले आणि शिडीत बसवले. त्यानंतर शिडीने खाली आणले.

Nagpur News : मनपा, पोलिसांचे ‘ऑपरेशन १०० किमी’

मित्र सोडून गेल्याने निराश ?

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मोनूची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर आले आहे. तो सोमवारी काही मित्रांसोबत नागपुरात आला होता. मात्र, मित्र त्याला सोडून निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नागपुरात आल्यानंतर खाण्यापिण्याचीही अडचण निर्माण झाल्याने त्याने टॉवरवर चढून रोष व्यक्त केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title: Nagpur news monu climbs tower veeru style antics begin sholay esque drama unfolds in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News
  • Nagpur Police
  • viral news

संबंधित बातम्या

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
1

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?
2

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
3

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
4

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.