Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : १०० नगरसेवकांनी केली आयुक्तांची कोंडी; सत्तापक्षनेते बाल्या बोरकर संतापले

Nagpur News : नागपूर महापालिकेत १०० नगरसेवकांनी आयुक्तांची कोंडी केल्याने राजकीय वातावरण तापले. या प्रकारामुळे सत्तापक्षनेते बाल्या बोरकर संतापले असून महापालिकेतील घडामोडींना वेग आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 14, 2026 | 05:30 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाची धावपळ
  • स्थायी समितीच्या मंजुरीनंतरही निधीसाठी प्रतीक्षा
  • ३५ कोटींची तरतूद, मंजुरी मात्र ५५ कोटींच्या प्रस्तावांना
Nagpur News : शहरातील विकासकामांना प्रशासनाकडून अपेक्षित गती मिळत नसल्याने सत्तापक्षातील नगरसेवकांचाही संयम सुटू लागला आहे. शुक्रवारी याच नाराजीचे चित्र मनपा मुख्यालयात पाहायला मिळाले. सत्तापक्ष नेत्यांनी १०० नगरसेवकांना एकत्र आणत थेट आयुक्त कार्यालय गाठले आणि प्रलंबित विकासकामांवरून प्रशासनाला जाब विचारला.

सत्ताधारी गटातील एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी एकाचवेळी आयुक्तांकडे धाव घेत असल्याने मनपा वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला. सत्तापक्षाच्या नगरसेवकांचीच विकासकामे रखडत असतील तर विरोधकांच्या प्रभागांची परिस्थिती काय असेल, असा सवालही उपस्थित होऊ लागला.

कार्यालयात बंद दाराआड झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी मुद्दा आक्रमकपणे मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. झोनल बजेटला मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष निधी उपलब्ध होत नसल्याने विकासकामे ठप्प असल्याची तक्रार केली .

Nagpur News : स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची १० कोटींची बचत; दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत

आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाची धावपळ

सत्तापक्षाच्या नगरसेवकानी आयुक्त कार्यालयात धडक दिल्यानंतर मनपा मुख्यालयातील प्रशासकीय हालचालींनाही वेग आल्याचे दिसले. प्रलंबित विकासकामांच्या फाईलींचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर विविध विभागांमध्ये मंजुरीची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयुक्त आठवडाभराच्या परदेश दौऱ्यावर जाणार असल्याने त्यांनी विविध विभागांच्या अधिका-यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर अनेक विकासकामांच्या फाईलीवर मंजुरीच्या सह्या झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

स्थायी समितीच्या मंजुरीनंतरही निधीसाठी प्रतीक्षा

मंजुरी मिळालेल्या कामांच्या फाईली प्रशासनाकडे रखडत असल्याने नगरसेविकांनीही नाराजी व्यक्त केली.
स्थायी समितीने काही मोजक्या विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली असली तरी त्यांची अंमलबजावणी करण्याऐवजी प्रशासनाकडून फाईली रोखल्या जात असल्याचा आरोप केला.

मंजुरी प्रक्रिया संगणकीकृत झाल्यानंतरही प्रस्ताव पुढे सरकत नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहे.
सत्तापक्षाच्या लोकप्रतिनिधींना स्वतःच्या विकासकामांसाठी आयुक्त कार्यालयात सामूहिकपणे जाण्याची वेळ येणे ही बाबच प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यातील समन्वयाचा अभाव दर्शविणारी आहे. थेट आयुक्त कार्यालय गाठण्याची वेळ का आली, यावरही मनपात चर्चा सुरू आहे.

Nagpur News : १४.१३ कोटींचा प्रकल्प अमृत २.० मधून वगळण्याची मनपाची तयारी; अतिक्रमणांमुळे लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाला खीळ

३५ कोटींची तरतूद, मंजुरी मात्र ५५ कोटींच्या प्रस्तावांना

यंदाच्या अर्थसंकल्पात दुर्बल घटक समितीसाठी जवळपास ३५ कोटींची तरतूद केली होती. मात्र, समितीच्या सभापतीनी एकही बैठक न घेता निधीचे वाटप केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष तरतूद ३५ कोटीची असताना ५५ कोटींच्या विकास प्रस्तावांना मंजुरी दिल्याचे सांगितले. या निधीचा नेमका लाभ कोणाला मिळाला, याचा तपशील समोर आणण्याची मागणीही होत आहे.

Web Title: Nagpur news 100 corporators commissioner balya borkar cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : रशियाच्या शांततेच्या अटी कायम; युक्रेन आक्रमक,पाश्चात्य देशांचा दृष्टिकोन मात्र बदलला
1

Russia Ukraine War : रशियाच्या शांततेच्या अटी कायम; युक्रेन आक्रमक,पाश्चात्य देशांचा दृष्टिकोन मात्र बदलला

Raigad News: दिवाळीच्या सुट्ट्यांत रायगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; १३ दिवस आधीच सुरू झाली रोपवे सेवा
2

Raigad News: दिवाळीच्या सुट्ट्यांत रायगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; १३ दिवस आधीच सुरू झाली रोपवे सेवा

Exclusive Interview: शिवसेना का फुटली? उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अरविंद सावंत यांनी सांगितली पडद्यामागची कहाणी!
3

Exclusive Interview: शिवसेना का फुटली? उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अरविंद सावंत यांनी सांगितली पडद्यामागची कहाणी!

Kolhapur Sindhudurg Fort: कोल्हापुरात दिवाळीनिमित्त साकारला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला; हुबेहूब प्रतिकृती पाहून व्हाल थक्क!
4

Kolhapur Sindhudurg Fort: कोल्हापुरात दिवाळीनिमित्त साकारला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला; हुबेहूब प्रतिकृती पाहून व्हाल थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.