
फोटो सौजन्य सोशल मीडिया
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध अतिविशेष दंतचिकित्सा सुविधांनी सुसज्ज होणाऱ्या या केंद्रामुळे विदर्भासह मध्य भारतातील दंत रुग्णांना मोठा लाभ मिळणार असून, दंत शिक्षण व संशोधनालाही नवी दिशा मिळणार आहे.केंद्राच्या प्रभावी संचालनासाठी शासनाने नवीन पर्दाना मान्यता दिली असून काही पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
एकूण ९१पदांपैकी ६० पदे भरली गेली आहेत. केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डीपीसीअंतर्गत सुमारे ३ कोटी ८९ लाख रुपयांच्या यंत्रसामग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच राज्य योजनेअंतर्गत सुमारे ३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यंत्रसामग्री खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.
Nagpur News : दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे
राज्यात सध्या ४ शासकीय दंत महाविद्यालय, १ मुंबई महानगरपालिकेचे नायर दंत महाविद्यालय आणि ३० हून अधिक खासगी दंत महाविद्यालय असून, देशातील राज्य सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या दंत महाविद्यालयांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. नागपूर येथील अतिविशेषोपचार दंतचिकित्सा व संशोधन केंद्र अत्याधुनिक तंत्रज्ञानासह कार्यान्वित झाल्यानंतर दंत संशोधन आणि रुग्णसेवेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची आघाडी आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.
शासकीय दंत महाविद्यालय,नागपूर येथे अगोदरच ६३ पदवी पूर्व बीडीएसच्या जागा, २४ पदवी उत्तर एम डी एस च्या जागा आणि शिष्यवृत्ती व पदव्युत्तर पीएचडी अभ्यासक्रम सुरू असून, नॅक अ प्लस श्रेणीकरण प्राप्त झालेली संस्था आहे. या नवीन केंद्राच्या माध्यमातून आता.
दंतचिकित्सेतील आधुनिक आणि विशेष उपचार सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यामध्ये डिजिटल डेंटिस्ट्री, कॉस्मेटिक डेंटिस्ट्री, ओरल इम्प्लांटोलॉजी, स्पोर्ट्स डेंटिस्ट्री, कॅनिओफेशियल सर्जरी आणि फॉरेन्सिक ओडोंटोलॉजी या सहा नवीन विभागांचा समावेश आहे.
Nitin Gadkari : ‘जातीच्या नावाखाली तिकीट घेणारा…’ जातीच्या राजकारणावर गडकरींचा निशाणा
या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे २२,००२ चौ. फूट जागेचे संपादन करण्यात आले असून, केंद्राचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे ४,७७०.१२ चौ. मीटर आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या या प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, बांधकामाच्या गुणवत्तेसाठी आणि नियोजनासाठी तांत्रिक मान्यताही देण्यात आली आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन ४ जानेवारी २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परीवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते.