Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News: विवाहाच्या काही तास अगोदर नवरदेवाने काढला पळ; किनवट तालुक्यात कुटुंबसंस्थेची चिंताजनक स्थिती

किनवटमध्ये लग्नाच्या काही तास आधीच बोहल्यावर चढण्यास सज्ज असलेला नवरदेव विवाहस्थळावरून निघून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. परस्पर विश्वास आणि कुटुंबातील संवाद यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 05, 2026 | 05:42 PM
incident occurred in Kinwat taluka where the groom ran away from the wedding venue

incident occurred in Kinwat taluka where the groom ran away from the wedding venue

Follow Us
Close
Follow Us:

Nanded News : किनवट : मागील काही दिवसांपासून समाजातील कुटुंब संस्था व पारंपरिक मूल्यांमध्ये झपाट्याने बदल होत असल्याचे चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर किनवट तालुक्यात घडलेल्या काही घटनांनी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत लग्नाच्या काही तास आधीच बोहल्यावर चढण्यास सज्ज असलेला नवरदेव विवाहस्थळावरून निघून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. संबंधित युवक पोलिस दलातील कर्मचारी असल्याची माहिती पुढे आल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या प्रसंगामुळे विवाह संस्थेतील जबाबदारी, परस्पर विश्वास आणि कुटुंबातील संवाद यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. (Nanded News)

सामाजिक जाणकारांच्या मते, शिक्षण, नोकरी व अन्य कारणांमुळे युवक-युवती घरापासून दूर राहत असल्याने त्यांच्या जीवनशैलीत मोठे बदल घडत आहेत. या बदलांमुळे पारंपरिक कुटुंब व्यवस्थेत मतभेद, गैरसमज आणि तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. किनवट तालुक्यातील विविध पोलिस ठाण्यांत नोंद झालेल्या तक्रारींच्या आधारे वैवाहिक आयुष्यातील मतभेद, पती-पत्नीतील संवादाचा अभाव तसेच सासरी नांदण्यास नकार देण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे सामाजिक कार्यकत्यांचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा : मी कामाचा माणूस आहे… राजकारणातून मतदारांना भावनिक आवाहन, पुणे जिल्ह्यात प्रचाराची दिशा बदलली

ही समस्या केवळ एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित नसून सर्व जाती-धर्मात दिसून येत असल्याने ती व्यापक सामाजिक स्वरूप धारण करत आहे. तज्ज्ञांच्या मते, बदलत्या सामाजिक परिस्थितीत युवकांमध्ये स्वावलंबनाची भावना वाढत असली तरी कुटुंबातील जबाबदाऱ्या, सहनशीलता, समजूतदारपणा आणि संवाद कौशल्य यांचे महत्त्व नव्याने रुजविण्याची गरज आहे. बालपणापासूनच मुलांना कौटुंबिक संस्कार, सामाजिक मूल्ये व नैतिक जबाबदाऱ्या यांचे शिक्षण देणे आवश्यक ठरत आहे. धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवचन, सामाजिक संस्थांचे उपक्रम यामधून कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. तसेच दूरदर्शन मालिका, चित्रपट व सोशल मीडियाचा तरुण पिढीवर होणारा प्रभाव लक्षात घेऊन योग्य दिशादर्शन करणेही गरजेचे बनले आहे.

या वाढत्या सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, मानसोपचार तज्ज्ञ व लोकप्रतिनिधींनी कत्रित पुढाकार घेऊन समुपदेशन शिबिरे, कौटुंबिक मार्गदर्शन कार्यक्रम तसेच युवक-वतींसाठी जनजागृती उपक्रम राबवावेत, नशी मागणी नागरिकांतून होत आहे. कुटुंब संस्था मजबूत राहिल्यासच सर्वांगीण सामाजिक विकास साधता येईल, असे मत नर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा : नांदेडमध्ये कला महोत्सव ठरला फ्लॉप! रिकाम्या खुर्च्यांसमोर लोककलेचा अपमान

अशी प्रकरणे चिंताजनक

किनवट पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश कराड म्हणाले की, “माझ्या १८ वर्षांच्या सेवा कार्यकाळात पाहिली नाही. मी मुंबईसारख्या महानगरातही काम केले; मात्र तेथेही एवढ्या प्रमाणात कौटुंबिक वादाची प्रकरणे दाखल होत नाहीत, जितकी किनवटमध्ये होत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.” अशी बाब त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Ncident occurred in kinwat taluka where the groom ran away from the wedding venue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Family Members
  • Hingoli News
  • nanded news

संबंधित बातम्या

पाथरी नगर परिषदेच्या सभागृहात गदारोळ; गैरवर्तन केल्याप्रकरणी बाबाजानी दुर्राणींवर कारवाईचा बडगा
1

पाथरी नगर परिषदेच्या सभागृहात गदारोळ; गैरवर्तन केल्याप्रकरणी बाबाजानी दुर्राणींवर कारवाईचा बडगा

प्रशासनाच्या हलगर्जीमुळे २३ कोटींचा निधी परत; वेळेत वापर न केल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
2

प्रशासनाच्या हलगर्जीमुळे २३ कोटींचा निधी परत; वेळेत वापर न केल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

Hingoli News: हिंगोली जिल्हा होणार “क्षयरोग मुक्त जिल्हा”; जिल्हा प्रशासनाने राबवले खास अभियान
3

Hingoli News: हिंगोली जिल्हा होणार “क्षयरोग मुक्त जिल्हा”; जिल्हा प्रशासनाने राबवले खास अभियान

Political News : नांदेडला ‘होली सिटी’ दर्जा द्या; खासदार डॉ. अजित गोपछडे यांची राज्यसभेमध्ये मागणी
4

Political News : नांदेडला ‘होली सिटी’ दर्जा द्या; खासदार डॉ. अजित गोपछडे यांची राज्यसभेमध्ये मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.