कणकवली : सरस्वती हायस्कुल नांदगाव 1999 – 2000 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत त्या काळात ज्यांनी विद्येचे दान केलं, तसेच ज्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शिक्षणात हातभार लावला, ज्या संस्था चालकांनी शिक्षणाचे दालन उभं केलं, त्या सर्वांचा मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला. तब्बल 24 वर्षानंतर मित्र-मैत्रिणी, संस्था पदाधिकारी, गुरुजन वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी एकत्र आल्याने वेगळाच स्नेहभाव सर्वांमध्ये निर्माण झाला. यावेळी माजी विद्यार्थ्यांमध्ये रंगलेल्या रोमहर्षक संगीत खुर्ची स्पर्धेत भगवान लोके विजेते ठरले तर स्नेहमेळाव्याच्या समारोपाला विविध गाण्यांवर माजी विद्यार्थ्यांनी ठेका धरत एक अनोखा आनंद उत्साह व्यक्त केला. 24 वर्षानंतर जिव्हाळ्याने भावबंध मनात रुजवत या माजी विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यासाठी प्रेरणा घेत कार्यक्रमाचा समारोप केला.
कणकवली तालुक्यातील नांदगाव सरस्वती हायस्कुलच्या 1999 – 2000 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि गुरुजनांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर नांदगाव पंचरक्रोशीतील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नागेश मोरये, खजिनदार सुभाष बिडये, मुख्याध्यापक सुधीर तांबे, निवृत्त शिक्षिका सुश्मिता बाबर, शिक्षिका कविता नलावडे, निवृत्त शिक्षकेत्तर कर्मचारी सदानंद सरवणकर, तसेच शिक्षक रघुनाथ कारेकर, शर्वरी सावंत, राजेश नारकर, उपेंद्र पारकर, श्रीकांत सावंत, श्रावणी मोरये, विलास तांबे, श्री. खरोडे, शिक्षकेत्तर कर्मचारी सुनील पारधिये, संतोष गोसावी, प्रभाकर सोळंखे, रामचंद्र नांदकर, माजी विद्यार्थी माया म्हसकर – तेली, भगवान लोके आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात चेअरमन नागेश मोरये, पत्रकार भगवान लोके, रमेश खाडे यांचा सत्कार करण्यात आला.
चेअरमन नागेश मोरये म्हणाले, तुमच्यातलाच मी एक विद्यार्थी म्हणून मी या संस्थेच्या चेअरमन पदावर बसलेलो आहे. आपण माजी विद्यार्थ्यांनी हा स्नेहमेळावा आणि गुरुजनांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करुन या शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. 57 वर्षात असा पहिला कार्यक्रम झाला, त्याचा मला आनंद आहे. पुढील काळात जेव्हा जेव्हा तुम्ही हाक माराल तेव्हा संस्था आपल्या पाठीशी राहिल. त्यामुळे आमचा माजी विद्यार्थी रमेश खाडे, पत्रकार भगवान लोके यांनी सर्वांना एकत्र आणण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
मुख्याध्यापक सुधीर तांबे म्हणाले, शाळेमध्ये शिक्षकांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. आपण शिक्षक नेमायचे आणि आपणच त्यांचा पगार द्यायचा ही परिस्थिती आहे. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी या शाळेच्या इमारती सुस्थितीत बनवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कारण आम्ही तुम्हाला इंजिनिअरींगच किंवा उच्च शिक्षण दिलेलं नसेल पण तुमचा जो बेस आहे. तुमची जी बाराखडी शिकण्याची जी सुरुवात आहे. ती तुमची इथुन झालेली आहे. त्यामुळे या संस्थेच्या उद्धारासाठी प्रयत्न करावेत.
पत्रकार भगवान लोके म्हणाले, सरस्वती हायस्कुलने आम्हा सर्व विद्यार्थ्याना घ़डवलं. त्यामुळे या संस्थेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे चेअमन नागेश मोरये व सर्व शिक्षक यांचे आम्ही ऋणी आहोत. त्यामुळेच गुरुजणांना सत्कार सोहळा आणि स्नेहमेळावा 24 वर्षानी आमच्या बॅचने आयोजित केला. पुढील काळात आमच्या बॅचच्या माध्यमातून शाळेसाठी लागणारे योगदान दिलं जाईल.
माजी विद्यार्थी रमेश खाडे म्हणाले , माझ शिक्षण कोकणात झालं , 20 वर्षे मी कोकणात राहिलो. आम्हा सर्वांना एकत्र भेटून आनंद झाला आहे. ज्या शिक्षकांनी आमच्या जीवनाला आकार दिला . त्यांची भेट घेण्यासाठी हे गेट टुगेदर निमित्त ठरले. माजी विद्यार्थी माया म्हसकर म्हणाली , या हायस्कुल मधुन बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच शिक्षक आणि सर्व लोकांना भेटता आले. या हायस्कुल मधुन झालेले ज्ञान दाणाचं काम आम्ही कदापी विसरु शकणार नाही.
या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी रमेश खाडे , भगवान लोके , माया म्हसकर – तेली , सत्यवान पवार , सत्यवान मर्ये , रघुनाथ लोके, प्रदिप सावंत , आरती नातू , भूषण दळवी , रुपेश मोर्ये , इम्रान बटवाले , मज्जीद बटवाले , जाफर बटवाले , दिलदार नवलेकर , सचिन गुरव , संदीप रांबाडे , गुरुनाथ तांबे , संदिप तांबे , प्रदिप गावडे , फिरोज साटविलकर , अरुण कारेकर , नितीन कदम आदींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात सत्कार मुर्ती निवृत्त शिक्षिका सुश्मिता बाबर यांनी मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय सावंत यांनी केले तर आभार श्रीकांत सावंत यांनी मानले.