Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg News : “पुन्हा एकदा गणपती खड्डयांतून आणावे लागणार, विकासाच्या नावाखाली राणेंनी….”; परशुराम उपरकरांचा खोचक टोला

तालुक्यात राणे विरुद्ध उपरकर अशी खडाजंगी सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राणे कुटुंबाला टोला लगावला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 18, 2025 | 12:56 PM
Sindhudurg News : “पुन्हा एकदा गणपती खड्डयांतून आणावे लागणार, विकासाच्या नावाखाली राणेंनी….”; परशुराम उपरकरांचा खोचक टोला
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : तालुक्यात राणे विरुद्ध उपरकर अशी खडाजंगी सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राणे कुटुंबाला टोला लगावला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री आढावा बैठक घेत जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्याप्रमाणे खासदार नारायण राणे यांनी देखील महामार्ग व विविध विभागाच्या आढावा बैठका घेतल्या , परंतु यातुन जनतेचे प्रश्न मार्गी लागलेत का ? असा सवाल उपरकरांनी केला आहे.

उपरकर पुढे असंही म्हणाले की, नवीन सार्वजनिक बांधकामच्या अधिक्षक कार्यालय झाले . त्याठिकाणी अधिक्षक अभियंता पदावर नियुक्तीची ऑर्डर होऊनही संबंधित अधिकारी हजर झालेले नाहीत. पाटबंधारे विभागात रिक्त पदे आहेत. जिल्ह्यातील विविध प्रशासकीय पदावर अधिकारी नसल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे, असा आरोप उपरकर यांनी केला आहे. तसंच प्रमोद जठार यांच्या मागणीनुसार छत्रपतींचे स्मारक सिंधुदुर्ग किल्यावर उभारावे , अशी मागणी देखील उपरकरांनी केली.

कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर म्हणाले की,नारायण राणे व पालकमंत्री आपण बैठक घेत विकास करत आहोत, असे भासवत आहेत. जिल्ह्यातील महामार्गासह ग्रामीण रस्ते पूर्णत: खड्डेमय झालेले आहेत. त्यामुळे चालु वर्षी पुन्हा एकदा गणपती खड्डयांतून आणावे लागणार , अशी मानसिकता लोकांनी करायला हवी. शिवसृष्टी करताहेत त्याठिकाणी 30 लाख गुंठे दराने जमीन खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. ही शासनाची लूट आहे. यापूर्वी चिपी विमानतळासाठी 150 परगुंठा दराने जमीन घेतली तर सीवर्ल्ड प्रकल्पासाठी शासनाने परगुंठा 1 हजार दर जाहिर केला होता , अशी आठवण परशुराम उपरकर यांनी करुन दिली आहे.

भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार असताना अरबी समुद्रातील स्मारक हे ख-या अर्थाने मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यात उभारण्यात यावे. कोट्यावधी रुपये तिकडे खर्च करण्यापेक्षा मालवण समुद्रात हे स्मारक व्हावे अशी जठार यांची मागणी होती. त्यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत. त्याउलट शिवसृष्टीच्या नावाखाली शासनाची लूट चालवली आहे. राजकोट येथील पुतळ्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन नागरिकांसाठी पुतळा पाहण्यास बंद ठेवण्यात आला आहे , असा टोला उपरकर यांनी लगावला.

पॉलिटेक्निक आणि आयटीआयमध्ये कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत वाढवण बंदरात आवश्यक असलेल्या नोकर भरतीच्यानुसार प्रशिक्षण देण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठक घेतली. मात्र आयटीआय व पॉलिटिक्निकमधील प्रश्न असलेली रिक्त पदे सोडविण्याबाबत कोणतेही प्रश्न नाहीत. फक्त दिखाऊपणाचा विकास सुरु असल्याचा टोला उपरकर यांनी लगावला आहे.

Web Title: Narayan rane misled the public by holding meetings in the name of development alleges parashuram uparkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • kankavali
  • Narayan Rane
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
1

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण
2

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ?  हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको
3

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ? हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा
4

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.