Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: समृद्धीवर रक्ताचे सडे… ! ८ महिन्यांत २४ बळीं, मदतीसाठी तासन् तास पहावी लागते वाट

सिमेंट काँक्रीटमुळे रस्ता कायम तापलेला असतो, वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन आणि रस्त्याची रचना यामुळे वाहनांच्या टायरवर ताण येतो, त्यातच रस्त्यांवरील साध्यामध्ये असलेले अंतर वाहनांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याचे ठरत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 28, 2026 | 10:56 AM
Nashik News: समृद्धीवर रक्ताचे सडे… ! ८ महिन्यांत २४ बळीं, मदतीसाठी तासन् तास पहावी लागते वाट
Follow Us
Close
Follow Us:
  • इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो परिसरात गेल्या ८ महिन्यांत तब्बल २३ भीषण अपघात
  • अपघात झाल्यास जखमींना तातडीने मदत मिळवण्यासाठी अंतर ठरतेय अडथळा
  • ३० ते ३५ लोकांना आतापर्यंत या महामार्गावर कायमस्वरूपी अपंगत्व
Nashik News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या मुंबई-नागपूर महामार्गावर अपघातांची समृद्धी मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीय. इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो परिसरात गेल्या ८ महिन्यांत तब्बल २३ भीषण अपघात झाले असून, यात २४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपूर्ण सुविधा आणि तांत्रिक त्रुटींमुळे हा महामार्ग प्रवाशांसाठी ‘जीवघेणा’ ठरत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

इगतपुरी ते आमने या दरम्यान सध्या केवळ दोन एक्झिट आहेत. अपघात झाल्यास जखमींना तातडीने मदत मिळवण्यासाठी हे अंतर अडथळा ठरत आहे. जर कसारा येथे नवीन एक्झिट उभारला, तर अवघ्या १ किलोमीटरवर वैद्यकीय उपचार आणि मदत उपलब्ध होऊ शकते. तसेच मुंबई-नाशिक महामार्ग हा पर्यायी मार्ग म्हणून केवळ दीड किलोमीटरवर उपलब्ध होईल. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने सर्वेक्षण करून कसारा एक्झिट मंजूर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

MSC Bank Scam सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा; शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणाला पूर्णविराम

तापणारे रस्ते आणि तांत्रिक त्रुटी

सिमेंट काँक्रीटमुळे रस्ता कायम तापलेला असतो, वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन आणि रस्त्याची रचना यामुळे वाहनांच्या टायरवर ताण येतो, त्यातच रस्त्यांवरील साध्यामध्ये असलेले अंतर वाहनांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याचे ठरत आहे. समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यानंतर टोल प्रशासन किया महामार्ग व्यवस्थापनाकडून कोणतीही तात्काळ मदत मिळत नसल्याची ओरड प्रवाशांनी केली आहे.

प्राथमिक उपचार आणि रुग्णवाहिका मिळण्यास विलंब होत असल्याने अनेक जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर दररोज होणान्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ३० ते ३५ लोकांना आतापर्यंत या महामार्गावर कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. प्रशासनाने केवळ टोल वसुलीवर लक्ष न देता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

८८ इगतपुरी से आमने यादरम्यान अपघात

घेऊन जाण्यास दहा ते पंधरा किलोमिटरचा फेरा मारावा लागतो. रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी एक तर पिंप्रीसदी एक्झिट किया शहापूरजवळील खुट्चर एक्सिट या मार्ग रुगणालय गाठावे लागते. अपघात जास्त ठिकाण व रुग्णालय यातील अंतर फारसे मोठे असणे तसेच समृद्धी एक्झिट हेदेखील खूप दूरवर असल्याने समृद्धी महामार्ग जणू मृत्यूचे दार ठरत आहे.
– राजेश असोपा, प्रवासी, शहापूर

राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम; काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाने केला दावा

मी, अंतरावर ८८ समृद्धी महामार्गावर आमने से सिन्नर या १२० कि. मी. कोणत्याही प्रकारची सोय सुविधा उदाहरणार्थ हॉटेल, पेट्रोल पंप, गॅरेज यासह क्रेन, रुग्णालय या गोष्टी उपलब्ध नसल्याने वाहतूकदार प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. या त्रुटीमुळे अपघातग्रस्तांना मदत मिळत नसल्याने समृद्धी महामार्ग वरील प्रवास हा जिकरीचा ठरत आहे. अलीम शेख, वाहनचालक

टायर ब्लास्ट आणि रस्तेबांधणी

सिमेंट काँक्रीटचा असल्याने या मागांवर प्रवास करताना वाहनाचे टायर अधिक गरम होतात, १००% फिटनेस नसलेल्या गाड्यांमुळे टायर फुटण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. इगतपुरी ते कसारा आणि कसारा ते आमने दरम्यान रस्त्यामध्ये सुमारे एक इंचाचे ‘गॅप’ आहेत, यामुळे भरधाव वेगात असलेली वाहने जोरदार आदळतात आणि चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होतात.

 

Web Title: Nashik news 24 deaths on samriddhi highway in 8 months people have to wait for hours for treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Samruddhi Mahamarg

संबंधित बातम्या

Samruddhi Mahamarg 1150 Crore Scam: समृद्धी महामार्गात १,१५० कोटी रुपयांचा घोटाळा!  दानवेंचा  भुमरेंवर गंभीर आरोप
1

Samruddhi Mahamarg 1150 Crore Scam: समृद्धी महामार्गात १,१५० कोटी रुपयांचा घोटाळा!  दानवेंचा  भुमरेंवर गंभीर आरोप

Samruddhi Mahamarg Extension: समृद्धी महामार्गाचा आता चंद्रपूरपर्यंत विस्तार! ₹२,३५३ कोटींचा निधी मंजूर
2

Samruddhi Mahamarg Extension: समृद्धी महामार्गाचा आता चंद्रपूरपर्यंत विस्तार! ₹२,३५३ कोटींचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.