Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक गर्भवती महिला मृत्यू प्रकरण; महिलेचा मृत्यू ‘या’ कारणामुळं?, मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक माहिती काय?

समोर आलेल्या माहितीनुसार या गर्भवती महिलने स्थानिक वैदूकडे काही औषधोपचार घेतले. तिचा मृत्यू हा प्रसूती वेदनांमुळे झाला नसल्याचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरुवारी (दि. २७) दिली. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 28, 2023 | 09:57 AM
नाशिक गर्भवती महिला मृत्यू प्रकरण; महिलेचा मृत्यू ‘या’ कारणामुळं?, मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक माहिती काय?
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : सोमवारी नाशिकमधील (Nashik) इगतपुरी तालुक्यातील जुनवणे या गावात महाराष्ट्राला वेदना देणारी घटना घडली होती. खराब रस्त्यामुळे गर्भवती महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे तिचा आणि पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली. (Nashik pregnant woman death cas) तसेच यावरुन बरेच राजकारण रंगले. याचे पडसाद विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात उमटले. सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी पाहयला मिळाली. पण आता या महिलेचा मृत्यू खराब रस्त्यामुळे किंवा गर्भवती महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचण्यास विलंब या कारणामुळं झाला नसून, एक वेगळ्या कारणामुळं झाल्याची महिती समोर येत आहे. (Nashik pregnant woman death case; Woman’s death due to ‘this’ reason…, what is the shocking information from the medical report)

महिलने वैदूकडे काही औषधोपचार घेतले?

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार या गर्भवती महिलने स्थानिक वैदूकडे काही औषधोपचार घेतले. तिचा मृत्यू हा प्रसूती वेदनांमुळे झाला नसल्याचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरुवारी (दि. २७) दिली. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत आरोग्य विभागाने अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. या महिलेचा मृतदेह गावी झोळीतूनच परत न्यावा लागल्याने या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. तसेच अनेक सामाजिक संस्था तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या महिलांनी या घटनेचा निषेध केला होता. त्यामुळं आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

मूत्यू वैदूकडून घेतलेल्या औषधांमुळं?

जुनवणेवाडी येथील वनिता भावडू भगत ( वय २३ ) या गरोदर आदिवासी महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्याने पहाटे अडीच वाजता दवाखान्यात जाण्यासाठी नातेवाईक आणि तिने पायपीट केली. दरम्यान, महिलेच्या प्रसूतीची तारीख सप्टेंबर महिन्यातील होती. आरोग्य केंद्रावर केलेल्या तिच्या सर्व चाचण्यांचे अहवाल साधारण होते, अशी माहितीही जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली. तसेच संबंधित महिलेचा मृत्यू हा प्रसूती वेदनांमुळे झालेला नाही. पण वैदूकडून घेतलेल्या औषधोपचारानंतर तिला उलट्या आणि प्रसूतीपूर्व झटके आल्याचे या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळं या महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळं झाला, यावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

Web Title: Nashik pregnant woman death case woman death due to this reason what is the shocking information from the medical report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2023 | 09:57 AM

Topics:  

  • Nashik
  • Pregnant woman

संबंधित बातम्या

Nashik Crime: नाशिक हादरलं! लघुशंकेवरून वाद आणि 35 वर्षीय मजुराची धारदार शस्त्राने हत्या
1

Nashik Crime: नाशिक हादरलं! लघुशंकेवरून वाद आणि 35 वर्षीय मजुराची धारदार शस्त्राने हत्या

Nashik Crime: नाशिकमध्ये तरुणींना बंद खोलीत डांबून ठेवत पिस्तुलाचा धाक; कॉलगर्ल बनवण्याचा दबाव, पैसेही लुटले
2

Nashik Crime: नाशिकमध्ये तरुणींना बंद खोलीत डांबून ठेवत पिस्तुलाचा धाक; कॉलगर्ल बनवण्याचा दबाव, पैसेही लुटले

Prasad Shrikant Purohit: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना बढती, मिळाले ‘हे’ मोठे पद
3

Prasad Shrikant Purohit: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना बढती, मिळाले ‘हे’ मोठे पद

Nashik : नाशिक हादरलं ! वडनेर रोडवर २ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला
4

Nashik : नाशिक हादरलं ! वडनेर रोडवर २ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.