Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Nashik News :त्र्यंबकरोड ते मुंबई रस्ता जोडला जाणार असल्याने नंदीनी नदीच्या एका बाजुला वसलेल्या मिलींद नगरमधील घरांचा अडथळा निर्माण झाला होता. अनेक वर्षांपासून येथे वस्ती असल्याने त्यांना हटविण्याची मोठी जोखीम होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 14, 2026 | 06:16 PM
मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई

मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई

Follow Us
Follow Us:

नाशिक : नंदीनी नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या रस्त्याला आडकाठी ठरणाऱ्या तिडके कॉलनीतील मिलींदनगर येथील २८ घरांवर अखेर मनपाच्या अतिक्रमण विभागाने जेसीबी चालविला. पुलाला लागून शंभर मीटरचा रस्ता नव्याने करण्यात येणार असल्याने दोन्ही बाजुच्या घरांचा अडथळा दूर करण्यात आला. मोठी कारवाई असल्याने सुमारे तीनशे पोलीस, मनपाचे शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा तासात रस्ता मोकळा केला.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात होणारी गर्दी लक्षात घेता मिलींदनगरला नंदीनी नदीवर सध्या असलेल्या पुलावर दररोज वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागत असल्याने जुन्या पुलालाच काही अंतर सोडून नवीन पुलाचे काम करण्यात येणार आहे. या पुलामुळे त्र्यंबकरोड ते मुंबई रस्ता जोडला जाणार असल्याने नंदीनी नदीच्या एका बाजुला वसलेल्या मिलींद नगरमधील घरांचा अडथळा निर्माण झाला होता. अनेक वर्षांपासून येथे वस्ती असल्याने त्यांना हटविण्याची मोठी जोखीम होती. त्यासाठी बांधकाम खाते व नगररचना विभागाने सर्व्हे करून डिमार्केशन केले होते तसेच घरमालकांना दिड ते दोन महिन्यांपुर्वी नोटीसाही देण्यात आल्या होत्या, त्यातील बहुतांशी नागरिकांनी काही दिवसांपुर्वीच स्वतःहूनच घरातील सामान अन्यत्र हलवून दरवाजे, खिडक्या काढून नेल्या होत्या तर काही दुमजली, तिमजली घरांच्या इमारती उभ्या होत्या. अखेर शुक्रवारी (दि.१३) सकाळी मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्या आदेशान्वये अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरू करण्यात आली.

Pune ZP President : भोरला मिळणार ‘झेडपी’चे अध्यक्षपद? ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत

शेकडो कर्मचारी, जेसीबी, पोकलॅन, गॅसकटरसह पोहोचले पथक

या कारवाईसाठी मनपाचे पाच जेसीबी, पोकलैन, गैस कटर, हातोडा, फावड्यांसह शेकडो मनपा कर्मचारी सकाळी नऊ वाजता मिलींदनगरला दाखल झाले व अवघ्या काही वेळेतच कारवाईला सुरूवात करण्यात आली. या कारवाई मोहीमेस स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह दिडशे पोलीस अधिकारी व तीनशे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मिलींदनगरच्या प्रत्येक गल्लीत पोलीस तैनात करण्याबरोबरच तिडके कॉलनीतील दोन्ही रस्त्यावरही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच अत्यावश्यक बाब म्हणून रुग्णवाहिका, अतिरीक्त डम्पर व कर्मचारीही या कारवाईच्या दरम्यान राखीव ठेवण्यात आले होते.

असा असेल पूल व रस्ता

त्र्यंबकरोड व मुंबईकडे जाणारे रस्ते जोडणाऱ्या नंदीनी नदीवर ४५० मीटरचा नवीन पुल उभारण्यात येणार असून, त्यासाठी नयनतारा समोरील बाजुला असलेल्या ४० झाडे काही दिवसांपुर्वीच हलविण्यात आले. पुलाला जोडून दोन्ही बाजूंनी शंभर मिटरचा रस्ता करण्यात येणार आहे. त्यामुळे गोविंदनगरकडून नाशिक शहराकडे जाणाऱ्या वाहनचालकांची मोठी सोय होणार आहे.

यांनी घेतला मोहीमेत भाग

मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, विभागीय अधिकारी चंदन घुगे, राजाराम जाधव, प्रज्ञा त्रिभूवन, मदन हरिश्चंद्र, नानासाहेब साळवे, सुमन गवळी, उपभियंता निलेश साळी, प्रदीप भामरे, विनायक जाधव, प्रवीण बागुल, अमित पवार, उमेश खैरे, निखिल तेजाळे, तानाजी निगळ, बापू लांडगे, सुनील कदम, जावेद शेख, श्रीराम शिंदे, सुमित दिवे, भगवान सूर्यवंशी, जीवन ठाकरे, आदींनी यात भाग घेतला.

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

Web Title: Jcb operation lasted six hours on 28 houses in milindnagar nashik news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर! महाराष्ट्र आणि गोव्यातील ‘या’ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पाचवी बटालियन तैनात
1

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर! महाराष्ट्र आणि गोव्यातील ‘या’ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पाचवी बटालियन तैनात

सावध राहा! राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर; मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
2

सावध राहा! राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर; मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

शिक्षक बदलीचा वाद चिघळला; शिक्षण विभागाविरोधात संतप्त पालकांची आक्रमक भूमिका
3

शिक्षक बदलीचा वाद चिघळला; शिक्षण विभागाविरोधात संतप्त पालकांची आक्रमक भूमिका

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा
4

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.