Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine’s Day: मागणी वाढल्याने ‘गुलाब’ तेजीत, व्हॅलेंटाईन डेसाठी प्रेमी युगुलांकडून गुलाबाच्या फुलाला पसंती

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने प्रेमी युगुलांमध्ये लाल गुलाब खूप लोकप्रिय आहे. कारण तो प्रेमाचे प्रतीक मानला जातो. मात्र हेच गुलाब आता महाग झाल्याचं पाहायला मिळत आहे.व्हॅलेंटाईन डेसाठी प्रेमी युगुलांकडून गुलाबाच्या फुलाल

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 13, 2026 | 11:48 AM
मागणी वाढल्याने 'गुलाब' तेजीत, व्हॅलेंटाईन डेसाठी प्रेमी युगुलांकडून गुलाबाच्या फुलाला पसंती

मागणी वाढल्याने 'गुलाब' तेजीत, व्हॅलेंटाईन डेसाठी प्रेमी युगुलांकडून गुलाबाच्या फुलाला पसंती

Follow Us
Follow Us:
  • व्हॅलेंटाईन डेसाठी प्रेमी युगुलांकडून गुलाबाच्या फुलाला पसंती
  • मागणी वाढल्याने ‘गुलाब’ तेजीत
  • सात रुपयांना विकले जाणारे फूल दहा रुपयांना विकले जात आहे
वणी : फुलांचा राजा म्हणून ओळख असलेल्या गुलाबाला सध्या मागणी वाढली आहे. लग्नसमारंभ, विविध कार्यक्रम आणि आगामी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, निर्यातक्षम आणि दर्जेदार उत्पादन घेऊनही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने दिंडोरी तालुक्यातील गुलाब उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

सध्या सात रुपयांना विकले जाणारे फूल दहा रुपयांना विकले जात आहे. वरवर पाहता ही दरवाढ दिसत असली, तरी वाढता मजुरी खर्च, खते आणि औषधांच्या किमती पाहता ही वाढ अत्यंत ‘अल्प’ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लागवडीपासून ते फुलांच्या काढणीपर्यंतचा खर्च आणि मिळणारा प्रत्यक्ष मोबदला याचा ताळमेळ बसत नसल्याने भूमिपुत्र अस्वस्थ झाला आहे. तालुक्यातील जानोरी, मोहाडी, खडक सुकेणे, पालखेड, खेडगाव, आंबे दिंडोरी, जऊळके दिंडोरी या भागांत मोठ्या प्रमाणावर गुलाबाची शेती केली जाते. तालुक्यात ७५ हेक्टर क्षेत्रावर गुलाबाची लागवड आहे. १५ हेक्टर क्षेत्रावर आधुनिक पॉलिहाऊसमध्ये विविध रंगांच्या गुलाबांचे उत्पादन घेतले जाते. कमी वेळेत नगदी उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी इतर पिकांना फाटा देऊन फुलशेतीकडे वळला आहे.

Nashik News : उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर

वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्चात वाढ

शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आता पॉलिहाऊसमध्ये गुलाबाची लागवड केली आहे. त्यासाठी एकरी ६० लाख रुपये खर्च येत आहे, तर उघड्यावरील गुलाबशेतीसाठी एकरी ५ लाख रुपये खर्च येतो. उत्पादन खर्चात वाढ होत असली तरी उत्पन्नात मात्र अल्पशी वाढ झाली आहे. तालुक्यात गुलाब शेतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण आहे. इतर पिकांच्या तुलनेत जोखीम कमी आहे. शेतकऱ्यांनी फुल शेतीकडे वळल्यास उत्पन्नात वाढ होईल. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात विविध डे व लग्नसमारंभ यामुळे फुलांना मागणी असते. भांडवलात वाढ झाली, मात्र पाहिजे तेवढे बाजारभाव वाढले नाही. फेब्रुवारी महिन्यात अनेक सण उत्सव साजरे होतात त्यामुळे गुलाबाला मागणी वाढते, त्यामुळे भावातही वाढ होते, टॉपसिक्रेट गुलाबाला आज बाजारात चांगली मागणी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत भावात चढउतार होऊ शकतो. या वर्षी होण्याच्या अपेक्षेने सकारात्मक दर मिळण्याच्या उत्पादकांच्या धोरणामुळे व्यवसाय गतिमान झाला आहे.

रुग्णांच्या जीवाशी खेळ! शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात कालबाह्य औषधे

Web Title: Due to increased demand rose is in high demand lovers prefer roses for valentine day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • LIFESTYLE
  • Nashik
  • Valentine Day

संबंधित बातम्या

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार
1

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
2

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
3

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या
4

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.