Nashik Temple Threat : नाशिकमधील मंदिरांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या; भाविकांनी घाबरू नये, कालामंदीर पुजाऱ्यांचे आवाहन, सौजन्य : आयएएनएस
नाशिक जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे आणि देवस्थानांना नुकसान पोहोचवण्यासह बॉम्बने उडवण्याच्या धमक्या (Nashik Temple Threat ) मिळाल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्री कालाराम मंदिराचे पुजारी धनंजय आनंद यांनी भाविकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व मंदिरांमध्ये विशेष सतर्कता बाळगली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
धनंजय आनंद यांनी एका वृत्तसस्थेशी संवाद साधला. ते म्हणाले की, नाशिकमधील काही महत्त्वाच्या मंदिरांना आणि देवस्थानांना धमक्या मिळाल्याची माहिती अलीकडेच समोर आली आहे. त्यामुळे भाविकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मंदिरांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
नाशिकचे संपूर्ण पोलीस आणि जिल्हा प्रशासन या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. पोलीस पथकांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात असून मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि मंदिरांचे व्यवस्थापन एकत्रितपणे काम करत आहेत. भाविकांना कोणतीही भीती न बाळगता दर्शन घेता यावे, यासाठी सर्व मंदिरांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. मंदिर परिसरातही सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुजारी धनंजय आनंद यांनी दिली.
भाविकांनी मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. उत्साहाने आणि आनंदाने मंदिरांमध्ये दर्शनासाठी यावे, असे आवाहन धनंजय आनंद यांनी केले. सण-उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढते. त्यामुळे सर्वांनी शांतता आणि शिस्त राखून दर्शन घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर व्यवस्थापन आणि प्रशासन सातत्याने समन्वय साधून काम करत आहे. भाविकांच्या सेवेसाठी मंदिर प्रशासन पूर्णपणे उपलब्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Ans: नाशिकमधील काही प्रमुख मंदिरांना नुकसान पोहोचवण्याच्या आणि बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.
Ans: श्री कालाराम मंदिराचे पुजारी धनंजय आनंद यांनी भाविकांना घाबरू नये, असे आवाहन केले आहे.
Ans: मंदिर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलीस पथके सातत्याने देखरेख करत आहेत.






