पतंग उडवताना इमारतीच्या गच्चीवरून पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
नाशिकमध्ये पतंग उडवताना इमारतीवरून तोल जाऊन पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. नाशिकच्या गणेशनगरमध्ये आज सोमवारी ही दुर्घटना घडली. नक्ष संदीप बनकर असं मृत मुलाचं नाव आहे. नक्ष हा रवींद्र विद्यालयात इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होता. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने बनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वसंत ऋतू सुरु झाल्याने राज्यातील विविध ठिकाणी लहान, तरुण पतंग उडवातना दिसत आहेत. पतंग उडवण्याच्या आवडीमुळे मुले देहभान विसरलेले पाहायला मिळत आहेत. तसेच एखादी पतंग पकडण्यासाठी आजूबाजूला न पाहता पळताना दिसतात. पंतग उडवताना रस्त्यावरील धावत्या वाहनांकडेही लक्ष देत नाहीत. तर काही जण इमारतीच्या गच्चीवरून पतंग उडवण्याचा आनंद लुटतात. त्यावेळी काही बाबींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना घडतात. अशीच एक घटना नाशिकमध्येही घडली आहे.
विटा येथील शासकीय निवासी शाळेतील ११ ते १५ वयोगटातील इयत्ता सहावी ते दहावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या २४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सुरज प्रकाश जाधव ( वय १६ ), श्रवणकुमार विठ्ठल बागडे ( वय १७ ), सुरज किसन साठे ( वय १५ ), आदित्य आनंदा रोकडे ( वय १६ ), निर्मल किशोर सावंत (वय १४ ), स्मित सुभाष झिमरे ( वय १२ ), योगेश बिरुदेव मोटे ( वय १३ ), शुभम प्रकाश माळवे ( वय १४ ), हर्षवर्धन सुनील गायकवाड ( वय १३ ), तेजस सचिन काटे ( वय १५ ), आदित्य कैलास लोखंडे ( वय १६ ), आरूष संजय सकट ( वय १२ ), यश विजय सकट ( वय १२ ), श्रीवर्धन प्रवीण माने ( वय ११ ), प्रज्वल शशिकांत शिंदे ( वय १६ ), सिद्धार्थ जित्ताप्पा बनसोडे ( वय १३ ), आयुष नामदेव सावंत ( वय १३ ), तन्मय प्रकाश निकाळजे ( वय १४ ), सक्षम दिनकर सुखदेव ( वय १४ ), संदीप सुदर्शन नातपुते ( वय १४ ), प्रणव सुर्यकांत उबाळे ( वय १६ ), अभिषेक गौतम डोळसे ( वय १२ ), चैतन्य शशिकांत शिंदे ( वय १२ ), सक्षम तानाजी चंदनशिवे ( वय १२ ) अशी त्यांची नांवे आहेत.
विटा येथील साळशिंगे रस्त्यावरील आयटीआय कॉलेज शेजारी शासकीय निवासी शाळा आहे. रविवारी ( ता. १९ ) दुपारी विद्यार्थ्यांना खाण्यासाठी मासांहारी जेवण देण्यात आले होते. त्यानंतर दुपारी चार वाजता नाष्ट्यासाठी कलिंगड व दुध दिले होते. रात्री सात वाजता नेहमीप्रमाणे चपाती आमटीचे जेवण दिले. विद्यार्थ्यांना उलट्या व जुलाब सुरू झाल्याने आज सकाळी त्यांना विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.