Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSEDCL Smart Meter: नूतन वर्षात नवीन वीजबिल प्रणाली सुरू, लवकरच स्मार्ट मीटरसाठी निर्णय होणार लागू

MSEDCL Smart Meter News : राज्यात महावितरणकडून घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरु असून लवकरच स्मार्ट मीटरसाठी निर्णय लागू करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 23, 2025 | 01:06 PM
नूतन वर्षात नवीन वीजबिल प्रणाली सुरू, लवकरच स्मार्ट मीटरसाठी निर्णय होणार लागू

नूतन वर्षात नवीन वीजबिल प्रणाली सुरू, लवकरच स्मार्ट मीटरसाठी निर्णय होणार लागू

Follow Us
Close
Follow Us:
  • महावितरण कंपनीला 29 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य
  • आपण पाच कंपन्यांकडून स्मार्ट बसविणार आहेत
  • स्मार्ट मीटरसाठी नवीन वीजबिल प्रणाली लागू
नाशिक : केंद्र सरकारने आरडीएसएस योजनेअंतर्गत महावितरण कंपनीला 29 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले असून त्यासाठी सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याची अट घातली आहे. सुरुवातीला स्मार्ट मीटर बसविण्याची अट होती, मात्र आता आपण पाच कंपन्यांकडून स्मार्ट बसविणार आहेत. त्यानुसार नवीन वर्षांत स्मार्ट मीटरसाठी नवीन वीजबिल प्रणाली लागू करण्याचा निर्णय महावितरण कंपनी प्रशासनाने घेतला आहे.

‘महावितरण’ने फेडले 12800 कोटींचे कर्ज; कर्ज, स्वनिधीतून केली कर्जाची परतफेड

नवीन वीजजोडणीसाठी तसेच सदोष आणि नादुरुस्त मीटर बदलताना आधुनिक तंत्रज्ञानाचे टीओडी वीजमीटर बीज ग्राहकांकडे लावले जाणार आहे. हे मीटर प्रीपेड नसून, सध्याच्या मीटरप्रमाणे पोस्टपेड म्हणजे वीज वापरानंतर दरमहा बिल या पद्धतीचे राहणार आहे. त्यामुळे सध्याच्या बिलिंग प्रणालीमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. नव्या टीओडी मीटरमुळे ग्राहकांना त्यांचा वीजवापर नियमितपणे मोवाईल फोनवर वीजग्राहकांसाठी स्वस्त वीज दराच्या स्लॅबसाठी टीओडी (टाईम ऑफ डे) प्रणाली, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी नेट मिटरिंग, स्वयंचलित व अचूक मीटर रीडिंग तसेच वीजवापर किती झाला याची प्रत्येक मिनिटाला मोबाईलवर माहिती कळू शकणार आहे. कमी वीज वापरणाऱ्यांना कमी दर आणि जास्त वीज वापरणाऱ्या श्रीमतांना अधिक दर असे वीजदराचे सूत्र यापुढेही कायम राहणार आहे.

सवलतही मिळणार

महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीजदरनिश्चिती प्रस्तावात घरगुती ग्राहकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरल्यास सवलत देऊ केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

बिलिंगमध्ये येणार अचूकता

नव्या डिजिटल वीजमीटरमुळे ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक व स्वयंचलित रीडिंग होणार आहे. ग्राहकांना स्वतःच्या मोबाईलवर विजेचे मीटर रीडिंग प्रत्येक मिनिटाला पाहण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे दरमहा बिलिंग आणखी अचूक होणार आहे. मीटरचा फोटो अस्पष्ट घेणे, विविध कारणांमुळे मीटर रीडिंग घेता न येणे किंवा नादुरूस्त शेऱ्यामुळे सरासरी किंवा अंदाजे युनिटच्या वीजबिलाचे सध्याचे प्रकार बंद होणार आहे. स्मार्ट मीटर बसविणाऱ्या ग्राहकांची वीजबिले पूर्वीपेक्षा वाढलेली नाहीत, उलट १० टक्के सवलत देण्यात आली असून ती पाच वर्षे लागू राहील.

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Web Title: A new electricity bill system will start in the new year a decision for smart meters will be implemented soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • Nashik

संबंधित बातम्या

Karmala MSEDCL Billing Bssue: करमाळ्यात महावितरणचा भोंगळ कारभार; सोलर असूनही अवाच्या सवा वीज बिले
1

Karmala MSEDCL Billing Bssue: करमाळ्यात महावितरणचा भोंगळ कारभार; सोलर असूनही अवाच्या सवा वीज बिले

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! उन्हाळीस ९४९ रुपये, तर लाल कांद्याच्या बाजारभावात ५०० रुपयांची घसरण
2

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! उन्हाळीस ९४९ रुपये, तर लाल कांद्याच्या बाजारभावात ५०० रुपयांची घसरण

Maharashtra Weather : हुडहुडी कमी होणार! ख्रिसमसनंतरच मिळणार थंडीपासून दिलासा, काय आहे IMD चा अंदाज?
3

Maharashtra Weather : हुडहुडी कमी होणार! ख्रिसमसनंतरच मिळणार थंडीपासून दिलासा, काय आहे IMD चा अंदाज?

ठाकरेंनी २७ वर्षात जे कमावलं ते शिंदेंनी गमावलं! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल
4

ठाकरेंनी २७ वर्षात जे कमावलं ते शिंदेंनी गमावलं! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.