महावितरणच्या खाजगीकरण आणि पुनर्रचनेच्या निर्णयाविरोधात महानिर्मितीच्या वीज कर्मचाऱ्यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. राज्यभरातील सात प्रमुख वीज कर्मचारी संघटनांनी एकत्र येत संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांचा लाक्षणिक संप सुरू केला आहे. हा संप राज्यभर परिणामकारक ठरत असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे. या संपाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसताना दिसत आहे. नवी मुंबईतील सिवूड्स आणि करावे गाव या परिसरांमध्ये जाणूनबुजून वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला. विशेषतः शालेय परीक्षा सुरू असताना अशा प्रकारचे वागणूक विद्यार्थी आणि पालकांना अडचणीत टाकणारी ठरली आहे. महावितरण कर्मचाऱ्यांकडून मुद्दाम फॉल्ट निर्माण करून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिक , सामाजिक कार्यकर्ते आणि माजी लोकप्रतिनिधींनी थेट महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली अन् अधिकाऱ्यांचा घेराव घालत आपला निषेध नोंदवला आणि वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्याची मागणी केली. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्याची मागणी होत असून, जर जाणूनबुजून नागरिकांना त्रास दिला गेला असे आढळल्यास कडक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी आता जोर धरू लागली आहे.