तालुक्यात असलेल्या वीज ग्राहकांचे वीज मीटरचे तीन तेरा वाजल्याचं दिसून आलं आहे. मीटर तपासण्याची यंत्रणा कर्जत महावितरण कार्यालयात उपलब्ध नाही. त्यामुळे वीज मीटर तालुक्यातील ग्राहकांना पनवेलला जावं लागत आहे.
चिपळूणमध्ये स्मार्टवीज मिटर बसवल्यानंतर वाढीव वीज बिल येत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. याशिवाय ग्राहकांची संमत्ती नसतानाही जबदस्तीने महावितरणकडून स्मार्ट वीज मिटर बसवण्याचे प्रकार सुरू आहेत.
महावितरणला केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळातर्फे 'सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी' पुरस्कार प्रदान करण्यात आला. वीज वितरण सुधारणा, सौर ऊर्जा प्रकल्प, आणि कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठ्यासारख्या योजनांमुळे हा सन्मान मिळाला.
शहरात वास्तव्यास असलेले महावितरण जळगाव जामोद येथील सहाय्यक अभियंता किशोर माणिकराव होणे यांना थकीत वीज बिलाची वसुली करत असताना जळगाव शहरातीलच कुरेशी मोहल्ल्यामध्ये शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.
केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ला पूरक अशी स्वतंत्र योजना महाराष्ट्र सरकार आणणार आहे. तसेच, राज्यातील वीज दर कमी करण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.