Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: जानेवारी २०२७ पर्यंत सिंहस्थाची सर्व विकास कामे पूर्ण होणार; मनपा आयुक्त मनिषा खत्री यांचे आश्वासन

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासन पातळीवरून निधीची पुर्तता करण्यात आल्याचे मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी असं देखील सांगितलं की, जानेवारी २०२७ पर्यंत सिंहस्थाची सर्व विकास कामे पूर्ण होणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 12, 2025 | 03:03 PM
Nashik News: जानेवारी २०२७ पर्यंत सिंहस्थाची सर्व विकास कामे पूर्ण होणार; मनपा आयुक्त मनिषा खत्री यांचे आश्वासन

Nashik News: जानेवारी २०२७ पर्यंत सिंहस्थाची सर्व विकास कामे पूर्ण होणार; मनपा आयुक्त मनिषा खत्री यांचे आश्वासन

Follow Us
Close
Follow Us:
  • सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासन पातळीवरून निधीची पुर्तता
  • शहरात सुमारे १०० किलोमिटरच्या रस्त्यांची ९०० कोटी रूपये खर्चाची कामे सुरू
  • जमीन मालक शेतकऱ्यांसाठी फॉर्म्युला ठरला

गत सिंहस्थाचा विचार केल्यास ऑक्टोंबर २०१३ मध्ये त्यावेळच्या कामांची निविदा प्रक्रीया पूर्ण करण्यात आली होती. यंदा मात्र आपण जुलैमध्येच सर्व कामांचे नियोजन करून त्यापैकी जवळपास २० टक्के कामे पूर्ण केली आहेत. साधारणतः जानेवारी २०२७ मध्ये शहरातील सिंहस्थाची सर्व विकास कामे पुर्ण होतील व त्यानंतर फक्त कामांची चाचणी हेच काम शिल्लक राहिल, त्यामुळे सिंहस्थाची कामे सुरू झाली नाहीत असे म्हणणे योग्य ठरणार नसल्याचा निर्वाळा मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी दिला आहे. यावेळी त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या.

नोव्हेंबरपासूनच थंडीला सुरुवात; तापमानात होतीये घट, काही ठिकाणी धुके…

महापालिकेची आरक्षण सोडत अतिशय पारदर्शीपणे पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त करून आयुक्त खत्री यांनी शहरातील सिंहस्थ व विविध कामांची माहिती दिली. एसटीपीचे काम सुरू न होताच ठेकेदाराला पेमेंट केल्याचे काही ठिकाणी वृत्ते आली परंतु ते चुकीचे आहे. त्यातील बरेचसे काम सुरू झाले आहे असे सांगून आयुक्तांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासन पातळीवरून निधीची पुर्तता करण्यात आल्याने त्या दृष्टीने कामांचे वर्कऑर्डर देण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

यातील अनेक कामांसाठी मोठ मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या तसेच स्थानिक ठेकेदारांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धा वाढल्यामुळे अनेक कामे १५ ते १६ टक्के न्युनतम दराने गेले आहेत. त्यातून महापालिकेची सुमारे दिडशे कोटी रूपयांची बचत झाली असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. शहरात सुमारे १०० किलोमिटरच्या रस्त्यांची ९०० कोटी रूपये खर्चाची कामे सुरू करण्यात आली आहेत.

या कामांमध्ये झालेल्या बचतीतून हा निधी रस्ते व खड्डे बुजविण्यासाठी वापरला जाईल. शिवाय पुढच्या वर्षी नवीन लोकनियुक्त सदस्य येतील त्यांनाही त्यांच्या प्रभागात विकास कामांसाठी या निधीचा उपयोग करून घेता येईल असेही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील विकास कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने रामकाल पथ, डीडब्ल्यू टी, एस.टी.पी. अमृत योजना, गोदाघाट विस्तारीकरण, रस्त्यांचा शुभारंभ असे अनेक कामांचा समावेश आहे. यातील बरीचशी कामे यापुर्वीच सुरू करण्यात आल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.

साधूग्राम संदर्भात पुढच्या आठवड्यात बैठक

सिंहस्थ कभमेळा होताच ठेकेदाराला पेमेंट केल्याचे काही ठिकाणी वृत्ते आली परंतु ते चुकीचे आहे. त्यातील बरेचसे काम सुरू झाले आहे असे सांगून आयुक्तांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासन पातळीवरून निधीची पुर्तता करण्यात आल्याने त्या दृष्टीने कामांचे वर्कऑर्डर देण्यात आले आहेत.

Maharashtra Local Body Elections 2025: निवडणूक आदर्श आचारसंहिता सुरु; काय करावे अन् काय करु नये?

तपोवनात साधुग्राम उभारण्याबाबत जमीन मालक शेतकऱ्यांसाठी काही फॉर्म्युला ठरलेला आहे. त्याला मूर्त स्वरूप अद्याप दिलेले नाही. मात्र तत्पूर्वी दोन ते तीन वेळेस शेतकऱ्याशी प्रशासनाने चर्चा करून काही तोडगे सुचविलेले आहेत. आता १७ ते १९ या दरम्यान शेतकऱ्याच्या बैठका बोलविण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुमारे १८० शेतकऱ्यांना बोलविण्यात आले आहे. त्यांच्या याबाबत काय लेखी सूचना आहेत, म्हणणे आहे ते समजावून घेवू, त्यांना मोबदला टीडीआरमध्ये हवा की रोख हवा याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल. त्यासाठी शासनाशी देखील चर्चा सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: All development works of sinhastha will be completed by january 2027 municipal commissioner manisha khatri assures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

Kumbh Mela 2027: जळगावला विमानसेवा, पण ‘पर्यटन राजधानी’ छत्रपती संभाजीनगर अजूनही दुर्लक्षित!
1

Kumbh Mela 2027: जळगावला विमानसेवा, पण ‘पर्यटन राजधानी’ छत्रपती संभाजीनगर अजूनही दुर्लक्षित!

टोमॅटो पिकाच्या दरात वाढ! उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; घाऊक बाजारात आवक वाढूनही वधारले भाव
2

टोमॅटो पिकाच्या दरात वाढ! उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; घाऊक बाजारात आवक वाढूनही वधारले भाव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव
3

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

अपघात रोखण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश
4

अपघात रोखण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.