Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! अशोक खरातच्या फार्म हाऊसवर जिल्हा परिषदेची उधळपट्टी, शासकीय राजवटीत ‘मुक्त उधळण’

सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील इशान्येश्वर मंदिराला बेकायदेशीर तिर्थक्षेत्राचा दर्जा देवून राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने कोट्यवधी रूपये खर्च केल्याने खरातच्या राजकीय कनेक्शनची चर्चा होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 08, 2026 | 01:06 PM
धक्कादायक! अशोक खरातच्या फार्म हाऊसवर जिल्हा परिषदेची उधळपट्टी, शासकीय राजवटीत 'मुक्त उधळण'

धक्कादायक! अशोक खरातच्या फार्म हाऊसवर जिल्हा परिषदेची उधळपट्टी, शासकीय राजवटीत 'मुक्त उधळण'

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक: स्वयंघोषीत भोंदू अशोक खरात याच्या सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील इशान्येश्वर मंदिराला बेकायदेशीर तिर्थक्षेत्राचा दर्जा देवून राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने कोट्यवधी रूपये खर्च केल्याने खरातच्या राजकीय कनेक्शनची चर्चा होत असतांनाच आता नाशिक जिल्हा परिषदेने देखील प्रशासकीय राजवटीत खरातच्या मीरगावच्या फार्महाऊससाठी कोट्यवधीची उधळण केल्याची माहिती समोर येत आहे. खरातवर करण्यात आलेल्या शासकीय खैरातीचे कारण समजू शकले नसले तरी, एका महिला अधिकाऱ्याने या माध्यमातून दिलेली गुरूदक्षिणा मानली जात आहे. संपूर्ण राज्यातच खरातच्या राजकीय व शासकीय कनेक्शनविषयी उलट-सुलट चर्चा व संभ्रमीत करणारी माहिती दिवसेंदिवस उघड होत असत्तांना राजकीय कनेक्शनमध्ये राज्यस्तरीय राजकारण्यांचा समावेश असला तरी, शासकीय पातळीवर मात्र नाशिकमध्ये कार्यरत व बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांची अनेक नावे समोर येत आहेत. विशेषतः महिला आयएएस अधिकाऱ्याविषयी प्रचंड उत्सूकता निर्माण झालेली असतांना अशावेळी खरातवर जल्हा परिषदेने प्रशासकीय काळात केलेल्या उधळपट्टीच्या चर्चेने आता वेग घेतला आहे.

St Bus: एसटीचे अकार्यकारी अधिकारी मोकाट, प्रशासनाने नेमलेली चौकशी समिती अर्धवट, श्रीरंग बरगे यांचा आरोप

२०२२-२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग एकच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यातील मीरगावच्या विकासासाठी एक कोटीहून अधिक रक्कमेची तरतूद करून त्याआधारे खरातच्या फार्महाऊसच्या रस्त्यांची व तत्सम कामे करण्यात आल्याचे आता अधिकारीच सांगू लागले आहेत. खरातवर करण्यात आलेल्या या मेहेरबानीमागे देखील अनेक कारणांची चर्चा होऊ लागली असून, खातेप्रमुखानेच खरातचे शिष्यत्व पत्करल्यामुळे जिल्हा परिषदेची सिन्नर तालुक्यातील कामेच खरातच्या फार्महाऊसवरून चालविली जात असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित खाते प्रमुख महिला अधिकाऱ्याचे आठवड्‌यातील तीन दौरे सिन्नरच्या आढाव्या बैठकीसाठी राखीव ठेवले जात एवढेच नव्हे तर सुरूवातील जि.प.तील अन्य खातेप्रमुखांनाही अशा बैठकीसाठी पाचारण केले जात असतांना नंतर मात्र फक्त महिला अधिकारीच अशा प्रकारच्या बैठका घेवून अन्य खातेप्रमुखांना सिन्नरपासून दूर ठेवत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शासकीय बैठकीसाठी एका बाजुने शासकीय वाहन तर परतीच्या प्रवासासाठी खासगी वाहनाचा वापर या अधिकाऱ्याकडून केला जात असल्याने त्याविषयी तेव्हा घेतल्या जात असलेल्या शंका आता खऱ्या ठरू लागल्याचे दावे केले जात आहे.

अधिकाऱ्यांच्या संशयास्पद हालचाली

आयएएस दर्जाचे अधिकारी असतांना एकट्यानेच प्रवास करणे, चालक व अंगरक्षकाला दौऱ्यापासून दूर ठेवण्यात भलेही वैयक्तिक कारण असले तरी, त्यासाठीच्या संशयास्पद हालचालीची देखील आता चर्चा केली जात असून, आठवड्यातून दोन ते तीन वेळा सिन्नरमार्गे शिर्डी विमानतळावर जाण्याचे निमित शोधणे व खासगी वाहनाचा वापर करून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी परतण्यामागे खरोखरच शासकीय कारणे होती काय असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. मीरगावच्या खरातशी असलेल्या संबंधातूनच पुढे ‘पास्ते’ येथे घेतलेल्या जमीनीचे सातबारेही आता काहींनी खंगाळण्यास सुरूवात केली आहे.

ST Bus Fare Hike : उन्हाळ्यात एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, तिकीट दरांत 10 टक्के हंगामी भाडेवाढ

Web Title: Ashok kharat farmhouse zilla parishad spending allegations government funds misuse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी, ताबा मिळावा म्हणून SIT चा अर्ज
1

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी, ताबा मिळावा म्हणून SIT चा अर्ज

Ashok Kharat News : अशोक खरात विरोधात महिलाशक्ती एकवटली: तक्रारांचा आकडा वाचून बसेल धक्का
2

Ashok Kharat News : अशोक खरात विरोधात महिलाशक्ती एकवटली: तक्रारांचा आकडा वाचून बसेल धक्का

डिजीटल अरेस्ट पेक्षा घातक ज्योतिषीय अटक? भोंदूबाबा समाजात पसरवतायेत विष, महिला पडतायेत बळी
3

डिजीटल अरेस्ट पेक्षा घातक ज्योतिषीय अटक? भोंदूबाबा समाजात पसरवतायेत विष, महिला पडतायेत बळी

Ashok Kharat Case : ‘अशोक खरात तू तो गियो’ ED च्या एन्ट्रीनंतर आता मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल
4

Ashok Kharat Case : ‘अशोक खरात तू तो गियो’ ED च्या एन्ट्रीनंतर आता मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.