उन्हाळ्यात एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, तिकीट दरांत 10 टक्के हंगामी भाडेवाढ
Maharashtra ST Bus Fare Hike News Marathi: महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (MSRTC) १५ एप्रिल २०२६ पासून उन्हाळी सुट्ट्यांसाठी बस भाड्यात १०% हंगामी दरवाढ आणि प्रति तिकीट ₹२ स्वच्छता अधिभार लागू केला आहे. ही दरवाढ साध्या (लालपरी) बसेसना लागू होईल, तर शिवनेरी/शिवशाही बसेसवरही अतिरिक्त भाडे आकारले जाईल.
उन्हाळाच्या सुट्टीत एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता राज्य परिवहन (ST bus) महामंडळाने प्रवाशांकडून प्रति तिकीट २ रुपये स्वच्छता अधिभार आणि गर्दीच्या भाड्याच्या १० टक्के आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामी भाडेवाढ केवळ साध्या गाड्यांना असून स्वच्छता अधिभार सरसकट एसटी गाड्यांना लागू राहणार आहे. सध्या, मुंबई-पुणे प्रवासात साध्या एसटीचे भाडे २८१ रुपये आहे. १५ एप्रिलच्या हंगामी भाडेवाढीनुसार, ३१२ रुपये आणि २ रुपये अधिभार, असे एकूण ३१४ रुपये आकारले जातील.
अमली पदार्थ विक्रेत्यांवर मकोका लावणार; पुणे पोलिस आयुक्तांचा इशारा
राज्य परिवहन प्राधिकरणाने (STA) एसटी महामंडळाला यात्रा, उन्हाळी सुट्ट्या आणि सणासुदीच्या दिवसांत ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. २०२६ च्या उन्हाळी हंगामासाठी प्रवासी भाडेवाढ १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, ही भाडेवाढ १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर लागू केली जाईल. सुरुवातीचे भाडे केवळ दोन महिन्यांसाठी असून, स्वच्छता अधिभार कायमस्वरूपी असेल.
दरवर्षी, परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठ्या संख्येने प्रवासी ग्रामीण भागात जातात. यामध्ये, एसटीचे जाळे महाराष्ट्रातील छोट्या खेड्यापाड्यांपर्यंत पसरलेले आहे, त्यामुळे हजारो स्थलांतरित खाजगी वाहनांऐवजी एसटीलाचला पसंती देतात. एसटी महामंडळाच्या नियमानुसार गर्दीच्या दिवसात हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार आहे. त्याच नियमाचा वापर करुन महामंडळाने तात्पुरत्या कालावधीसाठी ही दरवाढ जाहीर केलेली आहे. हे भाडे लाल परी, मिडी बस, जलद देवा यांसारख्या विशेष बसेस आणि रात्रीच्या सेवा देणाऱ्या गाड्यांसाठी लागू आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रौढ प्रवाशांसाठी बसचे भाडे प्रति बस १२ रुपये आणि लहान मुलांसाठी ७ रुपये आहे.
१) परळ ते कोल्हापूर – ६४० रुपयांऐवजी ७०४ रुपये
२) मुंबई ते कोल्हापूर – ७५० रुपयांऐवजी ८२५ रुपये
३) मुंबई ते लातूर – ९०० रुपयांऐवजी १००० रुपये
४) मुंबई ते रत्नागिरी – ६०० आणि ७०० रुपये
हंगामी भाडेवाड (१०%): सुट्ट्यांमुळे १५ एप्रिलपासून सामान्य बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे.
स्वच्छता अधिभार (₹२): हा अधिभार सर्व प्रकारच्या एसटी बसवर (सामान्य ते एसी) लागू होईल.
मुख्य मार्गांचे दर (१५ एप्रिलनंतर): मुंबई-पुणे सामान्य बसचे भाडे ₹२८१ वरून ₹३१४ (अंदाजे) होईल.
नवीन भाडे दर: मुंबई ते कोल्हापूर सामान्य बसचे भाडे ₹७०४ पर्यंत आणि मुंबई-लातूरचे भाडे ₹१००० पर्यंत वाढू शकते.
सवलत सुरू: महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५०% सवलत मिळत राहील आणि ज्येष्ठ नागरिक (७५ वर्षांवरील) मोफत प्रवास करू शकतील.
डोंबिवली पश्चिमेलाही नव्याने होणार दुय्यम निबंधक कार्यालय, आमदार रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा






