Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Onion Price: शेतकऱ्यांवर पुन्हा संकट! कांद्याच्या दरात मोठी घसरण, १५ दिवसांत १ हजार रुपयांनी दर कोसळले

कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांदा दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र प्रत्यक्षात बाजारात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 06, 2026 | 03:46 PM
शेतकऱ्यांवर पुन्हा संकट! कांद्याच्या दरात मोठी घसरण, १५ दिवसांत १ हजार रुपयांनी दर कोसळले

शेतकऱ्यांवर पुन्हा संकट! कांद्याच्या दरात मोठी घसरण, १५ दिवसांत १ हजार रुपयांनी दर कोसळले

Follow Us
Close
Follow Us:
  • कांदा बाजारभावात मोठी घसरण
  • १५ दिवसांत १ हजार रुपयांनी दर आले खाली
  • लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये वाढले चिंतेचे वातावरण
लासलगाव : आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे ६०० रुपयांची घसरण झाली असून, मागील पंधरा दिवसांत तब्बल १ हजार रुपयांनी बाजारभाव खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

चांदी 3 लाखांचा टप्पा गाठणार! सराफा बाजारात मोठी उलाढाल होणार, तज्ज्ञांचं नेमकं म्हणणं काय?

लासलगावसह देशातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने बाजारात दरांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. त्यातच बांगलादेशातील सुरू असलेल्या हिंसाचारामुळे भारतातून होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणातच सुरू असल्याने निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच अरब देशांच्या बाजारपेठांमध्ये चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याला अपेक्षित मागणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर

सोमवारी (दि.५) सकाळच्या सत्रात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे १२०० वाहनांद्वारे २२ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या कांद्याला जास्तीतजास्त २१०९ रुपये, किमान ५०० रुपये, तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.

शेतकऱ्यांचे अंदाजे २०० कोटींचे नुकसान

या सर्व परिस्थितीचा फटका थेट भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बसत असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या पंधरा दिवसांत अंदाजे १७५ ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भविष्यात उत्पादन खर्च निघणेही होणार कठीण

सतत होत असलेल्या दरघसरणीमुळे भविष्यात उन्हाळ कांद्याप्रमाणेच या लाल कांद्याचेही उत्पादन खर्च निघणे कठीण होणार असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याची जास्तीतजास्त निर्यात परदेशात कशी वाढवता येईल, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी

 

Web Title: Farmers face crisis again huge drop in onion prices rates fall by 1000 rupees in 15 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • onion price

संबंधित बातम्या

कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल
1

कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.