चांदी 3 लाखांचा टप्पा गाठणार! सराफा बाजारात मोठी उलाढाल होणार, तज्ज्ञांचं नेमकं म्हणणं काय? (फोटो सौजन्य-Gemini)
पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेता, बहुतांश देश ईव्ही, सोलर पॅनल वापरण्यावर भर देऊ लागले आहे. हे उपकरणे बनवतांना यात चांदीचा वापर केला जातो. याशिवाय बॅटरी सेमी कंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटची कार्यक्षमता वाढविण्यासाठी देखील चांदीचा मोठा वापर केला जात आहे. परिणामी जगभरामधून चांदीला मागणी वाढली असून, औद्योगिक क्षेत्राची मागणी हि ५८ टक्यांपर्यंत पोहोचली आहे. जागतिक स्तराचा विचार केल्यास जगात चांदीची निर्यातीमध्ये चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु चांदी विकून नफा कमवण्यापेक्षा चीनने स्वस्तात सोलर पॅनल, सेमी कंडक्टर बनवून या उत्पादनांची निर्यात करून अधिकचे परकीय चलन कमविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे चीनने १ जानेवारीपासून चांदीच्या निर्यातीवर निर्बंध घातले असून जागतिक बाजारपेठेत चांदीचा मोठा तुटवडा असल्याचे तज्ञानी स्पष्ट केले आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असून सलग पाचव्या वर्षी पुरवठ्यात शॉर्टेज आले असून चांदीची मागणी अशीच वाढत राहिली तर चांदीचे दर तीन लाखापर्यंत जाऊ शकता, असा अंदाज आहे.
सोलर पॅनल आणि ईव्हीमध्ये चांदीचा वापर वाढला असून चीनने देखील चांदीच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीचा तुटवडा निर्माण होऊन चांदीचे दर वाढत आहे, असं मत सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी व्यक्त केलं आहे.
आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलवे वाहने बंद होण्याची शक्यता आहे. सध्या देशी विदेशी कंपन्यानी ईव्ही वाहने बनवण्यावर लक्ष केंद्रित केले असून एक इव्हीत ५० ग्राम चांदीचा वापर होत आहे. एकट्या ईव्ही क्षेत्राचा विचार केला तर या क्षेत्रात चांदीची मागणी १६ टक्यांनी वाढली आहे.
रविवारी चांदी २ लाख ४४ हजार रुपये प्रति किलो दराने विकली गेली. दर वाढण्यापूर्वी खरेदी केलेली चांदी गुंतवणूकदार विक्रीस काढून नफा बुक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधूनमधून चांदीच्या दरात घसरण शक्य आहे, परंतु दरातील ही घसरण तात्पुरती राहून पुन्हा दर वाढणार आहे.






