शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! उन्हाळीस ९४९ रुपये, तर लाल कांद्याच्या बाजारभावात ५०० रुपयांची घसरण
लासलगाव कृउबा समितीत गेल्या आठवड्यातील सोमवारच्या तुलनेत लाल कांद्याच्या दरात प्रतिक्विंटलमागे सुमारे ५०० रुपयांची, तर संपुष्टात येत असलेल्या जुन्या उन्हाळी कांद्याच्या दरात सुमारे ९४९ रुपयांची घसरण झाली आहे. परिणामी, लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजाराच्या आत येत सुमारे १,८०० रुपयांपर्यंत खाली आले असून उन्हाळी कांद्याचे दरही १,२०० रुपयांच्या आत घसरत सरासरी १,२५१ रुपयांपर्यंत आले आहेत.
कृउबा समितीत लाल कांद्याची सुमारे १,२०० वाहनांमधून आवक झाली. या कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीतजास्त २,६९०, किमान ५०० तर सरासरी १,८०० रुपये दर मिळाला. तसेच उन्हाळी कांद्याची सुमारे ३० वाहनांमधून आवक झाली असून, या कांद्याला जास्तीतजास्त १,७००, किमान ५०० तर सरासरी १,१५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. निर्यातीतील मर्यादा आणि वाढती आवक कायम राहिल्यास येत्या काळात कांद्याच्या दरांवर आणखी दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे शेतकऱ्यांमधील चिंतेचे वातावरण अधिक गडद होत आहे.
देशातून मलेशिया, दुबई, श्रीलंका सिंगापूर, इंडोनेशिया व्हिएतनाम, फिलिपाईन यांसह संपूर्ण आखाती देशात कांद्याची निर्यात सुरु आहे, मात्र कमी प्रमाणात, बांगलादेशात आता कुठेतरी २०० परवाने धारक व्यापा-यांना दररोज सहा हजार टन कांद्याच्या आयातीला सरकारने परवानगी दिली आहे. सर्व निबंध उठवत परवानगीसाठी केंद्र सरकारने उठपुरावा करावा तसेच देशातर्गत सर्वच राज्यांत कांदा रेल्वे मालगाडीने कसा निर्यात करता येईल, यासाठी मालगाडचा उपलब्ध करून द्याव्या, असं मत कांदा निर्यातदार व्यापारी मनोज जैन यांनी व्यक्त केलं आहे.
गेल्या आठवडयात ट्रॅक्टरभर लाल कांदा लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणले होते. त्यास ४,५०० रुपये इतका प्रतिविवंटलला जास्तीतजास्त बाजारभाव मिळाला. आज त्यातीलच कांदा विक्रीसाठी आणला, त्याला २.२०० रुपये दर मिळाला, असे झाले तर कांदा पिकवणारा शेतकरी मोतवा आर्थिक संकटात सापडेल, अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी प्रेमचंद परदेशी यांनी दिली आहे.
MSEDCL Smart Meter: नूतन वर्षात नवीन वीजबिल प्रणाली सुरू, लवकरच स्मार्ट मीटरसाठी निर्णय होणार लागू






