Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! उन्हाळीस ९४९ रुपये, तर लाल कांद्याच्या बाजारभावात ५०० रुपयांची घसरण

राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1 लाख 27 हजार क्विंटलची आवक झाली. यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी 500 रुपये सरासरी 1500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तसेच पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला सरासरी २२०० रुपयांपर्यंत

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 23, 2025 | 04:02 PM
रेशन दुकानांतून लवकरच मिळणार स्वस्त कांदा; कृषी मूल्य आयोगासमोर प्रस्ताव

रेशन दुकानांतून लवकरच मिळणार स्वस्त कांदा; कृषी मूल्य आयोगासमोर प्रस्ताव

Follow Us
Follow Us:
  • नवीन लाल कांद्याची आवक
  • कांद्याच्या बाजारभावात लक्षणीय घसरण
  • दरघसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली
लासलगाव (वा.) बांगलादेशसह परदेशात कमी प्रमाणात होत असलेली कांद्याची नियांत आणि कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन लाल कांद्याची आवक दाखल होत असल्याने कांद्याच्या बाजारभावात लक्षणीय घसरण झाली आहे. या दरघसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

लासलगाव कृउबा समितीत गेल्या आठवड्यातील सोमवारच्या तुलनेत लाल कांद्याच्या दरात प्रतिक्विंटलमागे सुमारे ५०० रुपयांची, तर संपुष्टात येत असलेल्या जुन्या उन्हाळी कांद्याच्या दरात सुमारे ९४९ रुपयांची घसरण झाली आहे. परिणामी, लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजाराच्या आत येत सुमारे १,८०० रुपयांपर्यंत खाली आले असून उन्हाळी कांद्याचे दरही १,२०० रुपयांच्या आत घसरत सरासरी १,२५१ रुपयांपर्यंत आले आहेत.

हुडहुडी कमी होणार! ख्रिसमसनंतरच मिळणार थंडीपासून दिलासा, काय आहे IMD चा अंदाज?

सोमवारी सकाळच्या सत्रात लासलगाव

कृउबा समितीत लाल कांद्याची सुमारे १,२०० वाहनांमधून आवक झाली. या कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीतजास्त २,६९०, किमान ५०० तर सरासरी १,८०० रुपये दर मिळाला. तसेच उन्हाळी कांद्याची सुमारे ३० वाहनांमधून आवक झाली असून, या कांद्याला जास्तीतजास्त १,७००, किमान ५०० तर सरासरी १,१५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. निर्यातीतील मर्यादा आणि वाढती आवक कायम राहिल्यास येत्या काळात कांद्याच्या दरांवर आणखी दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे शेतकऱ्यांमधील चिंतेचे वातावरण अधिक गडद होत आहे.

देशातून मलेशिया, दुबई, श्रीलंका सिंगापूर, इंडोनेशिया व्हिएतनाम, फिलिपाईन यांसह संपूर्ण आखाती देशात कांद्याची निर्यात सुरु आहे, मात्र कमी प्रमाणात, बांगलादेशात आता कुठेतरी २०० परवाने धारक व्यापा-यांना दररोज सहा हजार टन कांद्याच्या आयातीला सरकारने परवानगी दिली आहे. सर्व निबंध उठवत परवानगीसाठी केंद्र सरकारने उठपुरावा करावा तसेच देशातर्गत सर्वच राज्यांत कांदा रेल्वे मालगाडीने कसा निर्यात करता येईल, यासाठी मालगाडचा उपलब्ध करून द्याव्या, असं मत कांदा निर्यातदार व्यापारी मनोज जैन यांनी व्यक्त केलं आहे.

गेल्या आठवडयात ट्रॅक्टरभर लाल कांदा लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणले होते. त्यास ४,५०० रुपये इतका प्रतिविवंटलला जास्तीतजास्त बाजारभाव मिळाला. आज त्यातीलच कांदा विक्रीसाठी आणला, त्याला २.२०० रुपये दर मिळाला, असे झाले तर कांदा पिकवणारा शेतकरी मोतवा आर्थिक संकटात सापडेल, अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी प्रेमचंद परदेशी यांनी दिली आहे.

MSEDCL Smart Meter: नूतन वर्षात नवीन वीजबिल प्रणाली सुरू, लवकरच स्मार्ट मीटरसाठी निर्णय होणार लागू

Web Title: In summer 949 rupees while the price of red onions dropped by 500 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • agriculture
  • Nashik
  • onion

संबंधित बातम्या

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
1

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
2

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
3

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.