Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kumbha Mela Tender Scam: १५ हजार कोटींचा निधी आणि कमिशनचा खेळ? कुंभमेळा टेंडरमध्ये गिरीश महाजनांचा उल्लेख

राज्य आणि केंद्र सरकारने नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १५,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या रकमेपैकी काही हजार कोटी रुपये आधीच मिळाले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 09, 2026 | 11:06 AM
Nashik Kumbh Mela Tender Scam, Vilas Lad Section Officer Bribery,

Nashik Kumbh Mela Tender Scam, Vilas Lad Section Officer Bribery,

Follow Us
Close
Follow Us:
  • कुंभमेळ्यात सुमारे ५०० कोटी रूपयांच्या कामांचे टेंडर
  • विकास लाडच्याऑडिओमध्ये मंत्री गिरीश महाजनांचे नाव
  • मंत्री महाजन यांच्यापासून ते खालच्या लोकांपर्यंतचे पसेंटेज फिक्स असल्याचा लाडचा दावा
Nashik Kumbha Mel Tender: सिंहस्थ कुंभमेळ्याची कोट्यवधी रूपयांचे टेंडरवरून विरोधकांबरोबरच सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी शंका उपस्थित केल्या जात असतांना त्याला मंत्रालयातील एका कक्ष अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला आहे. सदर कक्ष अधिकाऱ्याचे कथित ध्वनीफित समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने त्याने कुंभमेळ्यात सुमारे ५०० कोटी रूपयांच्या कामांचे टेंडर आपल्याला मिळाल्याचा दावा करून, मंत्री महाजन यांच्यापासून ते खालच्या लोकांपर्यंतचे पसेंटेज फिक्स केल्याचे म्हटले आहे.

समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या या ध्वनीफितीवर अद्याप सत्ताधाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नसली तरी, विरोधकांकडून यावरून आरोपाच्या फैरी झडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चार दिवसांपूर्वीच मंत्रालयातील नियोजन वित्त विभागाचे कक्ष अधिकारी विलास लाड याला टेंडर देण्याच्या मोबदल्यात सहा लाख रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर विलास लाड याचे एका ठेकेदाराशी दूरध्वनीवरून झालेले बोलणे व्हायरल झाले आहे. त्यात हा अधिकारी ‘आपण येत्या एक दोन दिवसात व्हाईट कॉलवर बोलू’ असे ठेकेदाराला सांगत आहे. ‘नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा जानेवारी २७ साठी पंधरा हजार कोटीचे १०२४ प्रकारचे कामे मंजूर झाल्याचे सांगत आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दिलेला निधी अकौंटंटमध्ये जमा झाल्याचे म्हणत आहे.

Satara News: अवघ्या ७ मिनिटांत अग्निशमन दल दाखल! देशमुख सिटीतील भीषण आगीवर

मंत्री महाजनांपासून ते खालच्या लोकांपर्यंत पर्सेंटेज फिक्स

आपल्याला पाचशे कोटीचे कामे मिळाले असून, त्यातून ३८ कोटीचे तंबू उभारण्याचे काम एका ठेकेदाराला दिले आहे. अजून ७०० तंबू उभारायचे आहेत. त्यासाठी कुंभमेळामंत्री गिरीष महाजन ते खालच्या लोकांपर्यंतचे पसेंटेज फिक्स झाले आहे. आपल्याला टेंट उभारायचे आहे. सध्या टेंट व ई-टॉयलेट, जेवण नास्त्याचे काम मिळाले आहे’ असे म्हटले आहे. सध्या हा अधिकारी लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या ताब्यात असल्याचे समजते. त्यामुळे त्याच्या या कथित व्हायरल व्वनीफितीवर कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

विकास लाड यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?

राज्य आणि केंद्र सरकारने नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १५,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या रकमेपैकी काही हजार कोटी रुपये आधीच मिळाले आहेत. या कथित फोन कॉलमध्ये, अटक केलेल्या आरोपी विलास लाड दावा करतो की, त्याच्या वाट्याला ५०० कोटी रुपये आले आहेत. आपण वैयक्तिकरित्या ७०० तंबू, तसेच ई-टॉयलेट्स आणि स्वच्छतेसाठी निविदा मिळवल्या असल्याचा दावाही त्याने यात केला आहे.

मुंबई – नवी मुंबई विमानतळांना जोडणार Metro, सिडकोच्या अर्थसंकल्पात मेट्रो आणि रस्ते

तसेच, मला कुंभमेळ्यातील सकाळच्या नाश्त्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी १८ कोटी रुपयांची निविदा मिळाली आहे. कुंभमेळा ४० दिवस चालतो आणि त्यात इतका खर्च येत नाही, त्यात मला मोठं कमिशन मिळणार आहे, असाही दावा विलास लाड याने केल्याचे ऐकू येत आहे.

मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये संगनमताचा दावा

विलास लाडचा दावा आहे की, ‘या ऑडिओ क्लिपमधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कुंभमेळ्यासाठी १,०२१ प्रकारच्या कामांच्या निविदा आधीच व्यवस्थापित केल्या गेल्या आहेत. कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांसाठी कमिशनची टक्केवारी निश्चित करण्यात आली आहे. तुमच्या ओळखीचे लोक असतील तर आम्ही त्यांनाही टेंडर्स मिळवून देऊ; यात लाखो-कोटींची कमाई होण्याची शक्यता आहे.” अशा ऑफर्सही त्याने दिल्या आहेत.

 

Web Title: Ministers name dragged into row leaked audio suggests massive commission scam in kumbh mela works

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • girish mahajan
  • Kumbh Mela 2027
  • Maharashtra Political

संबंधित बातम्या

Dharashiv जिल्ह्यात ‘हर घर संविधान’ला हरताळ! उद्देशिका फ्रेम घोटाळ्याची सावली गडद
1

Dharashiv जिल्ह्यात ‘हर घर संविधान’ला हरताळ! उद्देशिका फ्रेम घोटाळ्याची सावली गडद

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींचा विकास आराखडा; भाविकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
2

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींचा विकास आराखडा; भाविकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.