Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : रिक्षाचालकांचा चालंलाय मनमानी कारभार, प्रवाशांची सुरु आहे आर्थिक लूट

शहरातील सीबीएस परिसरात रिक्षाचालकांकडून प्रवाशांची सर्रास आर्थिक लूट सुरूप्रवाशांच्या म्हणण्यानुसार, येथील सर्वच रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास साफ नकार देतात. उलट, मनमानी दर सांगत तासंतास थांबवून ठेवतात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 22, 2026 | 04:16 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मनमानी दर सांगत तासंतास प्रवाशांना थांबवून ठेवतात
  • दमदाटीमुळे नागरिक त्रस्त; पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष
  • आरटीओ, पोलिसांनी कारवाई करावी
नाशिक / राजू ठाकरे : शहरातील सीबीएस (सेंट्रल बस स्थानक) परिसरात रिक्षाचालकांकडून प्रवाशांची सर्रास आर्थिक लूट सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. पुण्याहून नाशिकला येणाऱ्या प्रवाशांना सीबीएस येथे उतरल्यावर पुढील प्रवासासाठी ऑटो रिक्षांचा आधार घ्यावा लागतो. मात्र, याच ठिकाणी रिक्षाचालकांकडून अवाजवी भाडे आकारणी करून प्रवाशांना अक्षरशः वेठीस धरले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, येथील सर्वच रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास साफ नकार देतात. उलट, मनमानी दर सांगत तासंतास प्रवाशांना थांबवून ठेवले जाते. विशेषतः रात्रीच्यावेळी ही लूट अधिक तीव्र होत असून, पर्याय नसल्याने प्रवाशांना अवाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे ओला, उबेरसारख्या ऑनलाईन सेवांवर चालणाऱ्या रिक्षांना येथील रिक्षाचालकांकडून तीव्र विरोध केला जात आहे.

Nashik News : मंदिराच्या आडून कुकर्माचा आरोप; बाबा खरातला फाशी द्या, मिरगावात संताप

प्रवाशांशी अरेरावी, दमदाटीमुळे नागरिक त्रस्त; पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

ऑफलाईनसह ऑनलाईन बुकिंग केलेल्या प्रवाशांशी अरेरावी, शिवीगाळ तसेच दमदाटीच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या रिक्षा चालकांनी नियमाप्रमाणे भाडे आकारून प्रवासी वाहतूक सेवा दिली तर येथील मुजोर रिक्षा चालक है प्रवाशांची इच्छा नसतांनाही त्या प्रवाशांना बळजबरीने आपल्या रिक्षात बसवतात. नियमाप्रमाणे योग्य दरात सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांकडून धाक दाखवित, लूट करीत पैसे वसूल करून घेतात. सीबीएस परिसरात काही रिक्षाचालक अंमली पदार्थ किंवा मद्यप्राशन करूनच ठाण मांडून बसत असल्याचाही आरोप प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

ठराविक प्रवाशांसाठी पहातात वाट

सीबीएस किंवा नाशिकरोडस्थानकावरील अनेक मुजोर रिक्षाचालक हे केवळ लॉजिंग व्यवस्था हव्या असलेल्याच प्रवाशांची वाट पाहत असतात. यासाठी ते इतर रिक्षाचालकांशी नेहमीच वाद घालत असतात. लॉजवर सोडलेल्या प्रवाशांच्या बदल्यात अशा ऑटो रिक्षाचालकांना मोठ्या प्रमाणात लॉजवरून कमिशन अदा केले जाते व OOLA त्यामुळे हे रिक्षाचालक व्यसनी व मुजोर होण्यास जास्त खतपाणी मिळते. असेही प्रवाशांचे मत आहे.

आरटीओ, पोलिसांनी कारवाई करावी

आरटीओ व पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. विशेषतः या भागांत नियमित गस्त, वाहनांची तपासणी, कागदपत्रांची पडताळणी आणि मीटरप्रमाणे भाडे आकारणी होत आहे का याची पाहणी करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अन्यथा ही समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Nashik News : पाथर्डी शिवारात भोंदू बाबा खरातची कोट्यवधीची बेनामी मालमत्ता; मूळ मालकांना धमकावल्याच्या तक्रारी

Web Title: Nashik news rickshaw drivers arbitrary behavior passenger looting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Nashik
  • Nashik News
  • Riksha

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
2

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!
3

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’
4

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.