(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
गावाची प्रतिमा मलिन करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त मागणी मिरगाव ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामसभा घेऊन खरात याचा निषेध नोंदवण्याबरोबरच गावबंदी त्याला करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. एका महिलेच्या तक्रारीवरून कॅप्टन खरात याला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मूळचा कहांडळवाडी येथील रहिवासी असलेल्या खरात यांनी मिरगाव येथे जाम नदीच्या काठावर ईशानेश्वर मंदिर उभारले होते. मात्र मंदिराच्या आडूनच गैरप्रकार केल्याचा आरोप होत असल्याने या प्रकरणाकडे राज्यभरातील माध्यमांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे मिरगावचे नाव बदनामझाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन कॅप्टन खरातचा निषेध नोंदवणार असल्याचे सांगितले. तसेच त्याला गावातून बहिष्कृत करण्याबरोबरच ईशान्येश्वर मंदिराचा ताबा ग्रामस्थांकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा रस्ता बंद केल्याचा आरोप गावात कोणीही जमीन विक्रीस काढली तर कॅप्टन खरात ती वाढीव दराने स्वतःच खरेदी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे स्थानिकांना हक्क असूनही जमिनी घेता येत नसल्याचे सांगण्यात आले.
काही नागरिकांना धाक दाखवणे, तसेच गोरगरिबांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच मंदिराच्या उत्तर बाजूला असलेल्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी असलेला रस्ता तारेचे कुंपण घालून बंद केल्यामुळे काही शेतकऱ्यांना रस्त्याअभावी शेती पडीक ठेवावी लागत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. ‘श्री शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष असलेल्या खरातसाठी दारणा धरणातून ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. ३१ जुलै २०२० रोजी यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला होता.






