
अवकाळी पाऊस अन् कडाक्याच्या थंडीमुळे भाजीपाल्याची आवक घटली
दरम्यान, दरवर्षी साधारण डिसेंबर महिन्यात नवीन भाजीपाला बाजारात येत असतो. मात्र, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे भाजीपाल्याच्या विशेषतः वेलवर्गीय भाजीपाल्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीनेही जोर धरला असून, त्यामुळे घाऊक बाजारपेठेत भाजीपाल बची आवक घटली आहे. आवक घटल्याने बाजारभाव तेजीत असून, वेलवर्गीय भाज्यांची आवक तर साधारण २५ टक्क्यांवर येऊन ठेपल्याचे बाजार समितीने सांगितले. अजून काही दिवस तरी भाजीपाल्याचे भाव चढेच राहतील, असा अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
थंडी आणि अवकाळी पावसामुळे वांगी, काकडी, कारले, भोपळा या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. घाऊक बाजारपेठेत वांगी ११० ते १३० रुपये, कारले ५९ ते ७० रुपये, भोपळा २० ते २४ रुपये, काकडी ३५ ते ४० रुपये किलोने विक्री होत आहे. तर फ्लॉवर २१ ते २८ रुपये, कोबी १६ ते १८ रुपये, ढोबळी मिरची ६२ ते ६८ रुपये, गिलके २५ ते ३४ रुपये, गवार ८० ते ९० रुपये, हिरवी मिरची ४० ते ५० रुपये, मेथी ३८ ते ४८ रुपये, शेपू २० ते २९ रुपये या दराने विक्री झाली.
घाऊक बाजारपेठेत साधारण दर असले तरी सर्वस्त्रधारण बाजारात मात्र यापेक्षा ३० ते ४० टक्के अधिक दराने भाजीपाला विक्री होत असतो. त्यामुळे हळूहळू भाजीपाला सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला असून, महिला वर्गाचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे.