Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: संवादातून वाद मिटवणे ही न्यायदानाची सकारात्मक बाजू; सातारा लोकअदालतीत न्यायमूर्ती राजेश पाटील यांचे प्रतिपादन!

Satara News: लोकअदालतीत लोकांना आपले म्हणणे मांडता येते. संवाद साधता येतो आणि परस्पर संमतीने वादावर तोडगा काढता येतो,” असे सांगत न्यायमूर्ती पाटील यांनी लोकअदालतीचे महत्त्व अधोरेखित केले.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 12, 2026 | 12:22 PM
Satara Lok Adalat, Justice Rajesh Shantaram Patil

Satara Lok Adalat, Justice Rajesh Shantaram Patil

Follow Us
Follow Us:
  • सातारा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
  • पालक न्यायमूर्ती राजेश शांताराम पाटील यांच्या हस्ते लोकअदालतीचे उद्घाटन
  • सामंजस्याने वाद मिटवणे ही न्यायदान प्रक्रियेची सकारात्मक बाजू असल्याचे प्रतिपादन
Satara News: न्यायालयात येणारा प्रत्येक पक्षकार हा आपल्या वादातून मार्ग काढण्यासाठी आणि न्याय मिळविण्यासाठी येत असतो. त्यामुळे पक्षकारांचा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी न्यायाधीशांनी प्रयत्न करणे, यात काहीही चुकीचे नाही. उलट, संवादातून आणि परस्पर सामंजस्यातून वाद मिटविणे ही न्यायदान प्रक्रियेची महत्त्वाची सकारात्मक बाजू आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती राजेश शांताराम पाटील यांनी केले.

राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अरविंद शं. वाघमारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा दिवाणी न्यायाधीश प्रियदर्शिनी अ. वाघमारे, जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी, सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष संदीप म. गायकवाड यांच्यासह न्यायव्यवस्था व विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विधी सेवा प्राधिकरणाची महत्त्वाची भूमिका

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा दिवाणी न्यायाधीश प्रियदर्शिनी वाघमारे यांनी जिल्ह्यातील विधी सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाची माहिती देतानाच लोकअदालतीची संकल्पना, उद्देश आणि त्याचे महत्त्व विशद केले. सर्वसामान्य नागरिकांना सुलभ, जलद आणि कमी खर्चात न्याय मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वाघमारे यांनी जिल्ह्यातील विधी सेवा विभागाची भूमिका स्पष्ट केली. न्यायव्यवस्था आणि समाजातील गरजू घटक यांच्यातील दुवा म्हणून विधी सेवा प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पक्षकारांना दिलासा देण्याची गरज

“जिल्ह्यात वर्षातून चार लोकअदालती आयोजित केल्या जातात. प्रत्येक लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व वकील बांधवांनी सहकार्य करावे. प्रत्येक लोकअदालतीत किमान दोन प्रकरणे तरी सामोपचाराने निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे आवाहन अरविंद वाघमारे यांनी केले. वकील, पक्षकार आणि न्यायालय यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास न्यायालयीन प्रक्रियेतील वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत होऊन पक्षकारांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकअदालतीचे महत्त्व व साताऱ्याचे कौतुक

यावेळी मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती राजेश पाटील म्हणाले, “पक्षकार न्यायालयात का येतो, याचा विचार केला पाहिजे. वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी न्यायाधीशांनी प्रयत्न केल्यास त्यात काहीही चुकीचे नाही.” देशाची लोकसंख्या मोठी असून त्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या कमी आहे. त्यामुळे उपलब्ध न्यायव्यवस्थेवर प्रकरणांचा मोठा भार आहे. अशा परिस्थितीत सामोपचाराने प्रकरणे निकाली काढण्यासाठी लोकअदालतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

“लोकअदालतीत लोकांना आपले म्हणणे मांडता येते. संवाद साधता येतो आणि परस्पर संमतीने वादावर तोडगा काढता येतो,” असे सांगत न्यायमूर्ती पाटील यांनी लोकअदालतीचे महत्त्व अधोरेखित केले.

सातारा जिल्ह्यात लोकअदालतीच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचे कौतुक करताना त्यांनी, “सातारा जिल्ह्यातील लोकअदालतीचे काम अतिशय चांगले आहे,” असे गौरवोद्गार काढले. लोकअदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी न्यायालयीन यंत्रणा, वकील आणि पक्षकार यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय लोकअदालत ही वाद वाढविण्याऐवजी संवादातून तोडगा काढणारी, वेळ व पैसा वाचविणारी आणि पक्षकारांना मानसिक व आर्थिक दिलासा देणारी प्रभावी न्यायव्यवस्था असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.

Web Title: National lok adalat inaugurated in satara by justice rajesh shantaram patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: “एसटी नियमित सुरू करा अन्यथा.. “; वाई-आसरेच्या ग्रामस्थांचा एसटी महामंडळाला इशारा
1

Satara News: “एसटी नियमित सुरू करा अन्यथा.. “; वाई-आसरेच्या ग्रामस्थांचा एसटी महामंडळाला इशारा

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन
2

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे
3

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Satara News : वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव
4

Satara News : वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.