
Nagnath Anna Naikwadi
Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने १९४२ चा स्वातंत्र्य लढा नागनाथअण्णा नायकवडी यांनी तीव्र केला होता. तत्कालीन सातारा जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये अनेक क्रांतिकारी चळवळी अण्णांच्या नेतृत्वाखाली सुरू होत्या. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी जहाल क्रांतिकारक म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्यावर कडी नजर ठेवली होती. वाळवा येथे अण्णांना अटक झाली. त्यांना इस्लामपूर येथील कारागृहामध्ये ठेवले होते. क्रांतिकारक कोणत्याही परिस्थितीत अण्णांना सोडवणार. क्रांती चळवळ हाताबाहेर जाणार म्हणून, क्रांतिकारक चळवळींचा वाढता प्रभाव पाहता. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांना सातारा जेल येथे ठेवण्यात आले होते. परंतु डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी इंग्रज सरकारच्या जोखडातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी सिताफिने सातारचा जेल फोडला आणि तिथून भिंतीवर उडी टाकून ते पसार झाले. भारत मातेच्या देश प्रेमाने प्रेरित झालेल्या अशा या भारत मातेच्या महान सुपुत्राच्या या उडीला यावर्षी ८२ वर्षे पूर्ण होत आहेत. क्रांतिकारक वाळवा तालुक्यातीलही अनेक मान्यवर आपली ही जबाबदारी समजून सातारा येथे १० सप्टेंबरला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन यावेळी वैभव नायकवडी यांनी केले.
सकाळी ठीक १० वा. शौर्य दिन कार्यक्रम मध्यवर्ती कारागृहाच्या समोर असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून साजरा केला जाणार आहे. यावेळी महाराष्ट्रातून अण्णांच्या विचारावर प्रेम करणारे हजारो लोक एकत्र येऊन भारत देश उभारणीसाठी नवीन संकल्प करतात. विशेषता सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त साखर कामगार संघटनेचे सर्व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करतात. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले कर्तव्य म्हणून शौर्यतीन साजरा करूया. असे आवाहन वैभवकाका नायकवडी यांनी केले आहे.
Washim News: दिव्यांगांना थकीत मासिक मानधन लवकरच मिळणार; आ. भावना गवळी यांची जनता दरबारात माहिती