Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Deur Vitthal Temple: सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊर येथील पुरातन दगडी विठ्ठल मंदिराची अवस्था चिंताजनक झाली आहे. मंदिराच्या शिखरातून पावसाचे पाणी थेट गाभाऱ्यात येत असून अनेक दगडी खांबांना भेगा पडल्या आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 07, 2026 | 05:01 PM
‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Follow Us
Follow Us:
  • शिखरातून गाभाऱ्यात पाणी, दगडी खांबांना भेगा!
  • देऊरच्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिराला जीर्णोद्धाराची प्रतीक्षा
  • देऊर ग्रामस्थांची शंभूराज देसाईंकडे मागण
Deur Vitthal Temple: कोरेगाव तालुक्यातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रचलित असलेल्या श्री क्षेत्र देऊर येथील पुरातन दगडी विठ्ठल मंदिराची अवस्था चिंताजनक बनली आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले हे मंदिर गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस आले असून, मंदिराचे अस्तित्व टिकवण्यासाठी तातडीने जीर्णोद्धार करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी देऊर ग्रामस्थ आणि भाविकांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.

12व्या शतकातील मंदिराचा ऐतिहासिक वारसा

देऊर येथे 12व्या शतकातील पुरातन दगडी विठ्ठल मंदिर असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या मंदिराला परिसरात विशेष धार्मिक महत्त्व आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी परिसरातील विविध गावांमधून भाविक देऊरमध्ये दाखल होतात. त्यामुळेच या क्षेत्राला ‘प्रति पंढरपूर’ अशी ओळख मिळाली आहे. या ठिकाणी गेल्या 58 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे. याशिवाय दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासात याच मंदिरातून पायी वारी काढली जाते. त्यामुळे हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून परिसरातील अनेक वर्षांची वारी आणि भक्ती परंपरा जपणारे केंद्र बनले आहे.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखान्याची निवडणूक; युगेंद्र पवार पुन्हा बारामतीच्या मैदानात

शिखरातून थेट गाभाऱ्यात येते पावसाचे पाणी

शेकडो वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या या दगडी मंदिराची सध्याची अवस्था मात्र ग्रामस्थ आणि भाविकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. मंदिराच्या शिखराला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून पावसाळ्यात शिखरातून पाणी थेट गाभाऱ्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मंदिरातील अनेक दगडी खांबांनाही भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मंदिराच्या संरचनेला आणखी धोका निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती आणि संवर्धन करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

पुरातत्त्व विभागाकडून मंदिराची पाहणी

मंदिराची ढासळती अवस्था लक्षात आल्यानंतर देऊर ग्रामस्थांनी राज्य पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर विभागाचे प्रादेशिक संचालक डॉ. वहाने यांनी नुकतीच मंदिराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पाहणीनंतर मंदिराच्या दुरुस्ती आणि संवर्धनासंदर्भात काही आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. पुरातन दगडी मंदिर असल्याने जीर्णोद्धार करताना मूळ वास्तुरचना आणि ऐतिहासिक स्वरूपाला धक्का न लावता काम करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाचे काम करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जीर्णोद्धारासाठी मोठ्या निधीची गरज

मंदिराच्या शिखराची गळती थांबवणे, भेगा पडलेल्या दगडी खांबांची दुरुस्ती तसेच संपूर्ण वास्तूचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांच्या स्तरावर एवढा खर्च करणे कठीण असल्याने शासनाने या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः मंदिराची पाहणी करावी आणि जीर्णोद्धारासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देऊर ग्रामस्थ आणि भाविकांनी केली आहे.

‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या या पुरातन विठ्ठल मंदिराचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का

Web Title: Ancient vitthal temple at deur koregaon in danger villagers seek restoration help

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल
1

Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला
2

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला

Manoj Jarange Patil: ‘…तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा
3

Manoj Jarange Patil: ‘…तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी
4

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.