Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव

Satara News : वाई डाक उपविभागाच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला. 19 ऑगस्टच्या PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये तब्बल ₹1 कोटी 58 लाखांचा विमाहप्ता जमा करण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Sep 06, 2026 | 10:07 PM
वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव

वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव

Follow Us
Follow Us:
  • वाई डाक उपविभागाने PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता जमा केला.
  • मुख्य पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी वाई डाक टीमच्या कामगिरीचे कौतुक केले.
  • उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डाक कर्मचाऱ्यांचा ट्रॉफी व पारितोषिकांनी गौरव
 

Satara News : वाई डाक उपविभागाने विविध उपक्रमांमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी कौतुकास्पद असून, ही कामगिरी डाक विभागासाठी अभिमानास्पद आहे. भविष्यातही वाई डाक उपविभागाची टीम अशीच उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास महाराष्ट्र व गोवा डाक परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी व्यक्त केला.

वाई डाक उपविभागाच्या वतीने ३० ऑगस्ट रोजी वाई येथील किसनवीर महाविद्यालयाच्या सभागृहात ‘ग्रामीण डाक सेवक संवाद व गौरव समारंभा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक प्रसून्ना रेड्डी होते. किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, डाक उपअधीक्षक मयूरेश कोळे, सहाय्यक डाक अधीक्षक हितेश पाठक, सातारा (प.) डाक उपविभागाचे निरीक्षक धनेश यादव तसेच वाई डाक उपविभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व स्वागतगीताने झाली. यावेळी १९ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आलेल्या PLI-RPLI महालॉगिन डे तसेच आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामीण डाक सेवक, सब पोस्टमास्तर आणि डाक कर्मचाऱ्यांचा ट्रॉफी व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

१९ ऑगस्ट रोजी झालेल्या महालॉगिन डे दरम्यान वाई डाक उपविभागाने तब्बल १ कोटी ५८ लाख रुपयांचा विमाहप्ता जमा केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वाईचे डाक निरीक्षक ज्ञानेश्वर डोंगरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक करण्यात आले.

मार्गदर्शन करताना मुख्य पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी भारतीय डाक विभागामार्फत अत्यंत कमी खर्चात डाक जीवन विमा (PLI) व ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) उपलब्ध करून दिला जात असल्याचे सांगितले. वाई तसेच परिसरातील नागरिकांनी या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रवर डाक अधीक्षक प्रसून्ना रेड्डी म्हणाले की, वाई डाक उपविभागाची कामगिरी खरोखरच गौरवास्पद आहे. सर्व उपविभाग एक टीम म्हणून काम करत असल्यामुळे अशक्यप्राय वाटणारी उद्दिष्टेही अत्यंत कमी कालावधीत साध्य झाली आहेत. भविष्यातही हीच कार्यक्षमता आणि टीमवर्क कायम ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

मराठा आरक्षणासाठी सातारा बंदची हाक; ‘राजधानी’ मराठा क्रांती मोर्चाचा मोठा निर्णय, व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

डाक उपअधीक्षक मयूरेश कोळे यांनीही वाई डाक उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी पारितोषिक विजेत्या काही कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास वाई डाक उपविभागातील सर्व ग्रामीण डाक सेवक, सब पोस्टमास्तर तसेच डाक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Web Title: Satara news wai post division rs 1 58 crore pli rpli mahalogin day award ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 10:07 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा
1

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा

मराठा आरक्षणासाठी सातारा बंदची हाक; ‘राजधानी’ मराठा क्रांती मोर्चाचा मोठा निर्णय, व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
2

मराठा आरक्षणासाठी सातारा बंदची हाक; ‘राजधानी’ मराठा क्रांती मोर्चाचा मोठा निर्णय, व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

Satara News : गणेशोत्सव शांततेत साजरा करा; DJ-डॉल्बीला पोलिसांचा नकार
3

Satara News : गणेशोत्सव शांततेत साजरा करा; DJ-डॉल्बीला पोलिसांचा नकार

Satara Half Marathon: धावण्याच्या शर्यतीत हृदय थांबले; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही पुण्याच्या धावपटूचा मृत्यू
4

Satara Half Marathon: धावण्याच्या शर्यतीत हृदय थांबले; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही पुण्याच्या धावपटूचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.