Navabharat Influencer Summit 2025, असा मंच जो सामाजिक बदल घडवणाऱ्या इन्फ्लुएंसर्सचा करेल सन्मान
Navabharat Influencer Summit 2025: हल्लीच्या सोशल मीडियाच्या जगात नकारात्मकता वेगाने पसरताना दिसत आहे. मात्र, काही असे देखील Social Media इन्फ्लुएंसर आहेत, जे त्यांच्या कृतीतून सामाजिक बदल घडवताना दिसत आहे. अशाच इन्फ्लुएंसर्सना एकत्र आणण्याचे काम नवभारत मीडिया ग्रुपने नवभारत इन्फ्लुएंसर समिट 2025 च्या माध्यमातून केले आहे. हा महत्वाकांक्षी कार्यक्रम उद्या म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ताज द ट्रीज येथे पार पडणार आहे.
यंदाच्या Summit ची थीम “Real Influence, Real Impact” अशी असून, 25 कॅटेगरीमध्ये Influencers ना सन्मानित करण्यात येणार आहे. ज्यांनी सोशल सर्व्हिस, एज्युकेशन, हेल्थ, आर्ट, क्रिएटिव्हिटी, टेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अनुराग ठाकूर, खासदार आणि माजी कॅबिनेट मंत्री, भारत सरकार उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार आणि शिवसेना गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे सन्माननीय पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहतील. याशिवाय डॉ. संजय मुखर्जी (आयएएस), महानगर आयुक्त, एमएमआरडीए; विजय सिंघल (आयएएस), उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सिडको; तसेच कृष्ण प्रकाश (आयपीएस), अतिरिक्त पोलिस महासंचालक, फोर्स वन, हेही या विशेष सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी https://navabharatmedia.in/influencersummit2025/ या वेबसाइटवर क्लिक करा.