Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Megablock: मुंबई-पुणे मार्गावर तब्बल 19 तासांचा मेगाब्लॉक; ‘या’ एक्स्प्रेस रद्द

आपले तिकिट रद्द किंवा रिफंड किंवा बदलायचे असल्यास IRCTC पोर्टल, स्थानक काउंटर किंवा मध्य रेल्वेच्या अधिकृत घोषणांचा आधार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 10, 2025 | 09:27 PM
Railway Megablock: मुंबई-पुणे मार्गावर तब्बल 19 तासांचा मेगाब्लॉक; ‘या’ एक्स्प्रेस रद्द
Follow Us
Close
Follow Us:
१९ तासांचा मेगा-ब्लॉक जाहीर
पुणे-मुंबई मार्गावर मोठ्या प्रमाणावर सेवा प्रभावित होणार
महत्वाच्या गाड्या फक्त पुण्यापर्यंत चालवल्या जाणार
पुणे: मध्य रेल्वेने कर्जत यार्डचे पुनर्रचना आणि नॉन-इंटरलॉकिंग (सिग्नलिंग सिस्टीमचे आधुनिकीकरण) कामांसाठी पळसदरी — भिवपुरी विभागात एक १९ तासांचा मेगा-ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक शनिवार, 11 ऑक्टोबरला दुपारी 12:20 वाजता सुरू होऊन रविवार, 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ७.२० वाजेपर्यंत लागू राहणार आहे; त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावर मोठ्या प्रमाणावर सेवा प्रभावित होतील.
रद्द/बदल झालेल्या गाड्या (मुख्य तपशील)

रद्द होणाऱ्या प्रमुख एक्स्प्रेस गाड्या

12125/12126 CSMT–Pune–CSMT — प्रगती एक्सप्रेस
12123/12124 — डेक्कन क्वीन
11008 — पुणे–CSMT डेक्कन एक्सप्रेस
12128 — पुणे–CSMT इंटरसिटी एक्सप्रेस
22106 — पुणे–CSMT इंद्रायणी एक्सप्रेस.
इतर बदल किंवा मर्यादीत धाव

काही महत्वाच्या गाड्या फक्त पुणे पर्यंतच चालवण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.  उदा. 11030 (कोल्हापूर–CSMT कोयना) आणि 11302 (बेंगळुरू–CSMT) यांचे पुढील मार्ग (पुणे ते मुंबई) रद्द राहतील. काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांना पर्यायी मार्गांवर वळवण्यात आले असून, स्थानिक (लोकल) सेवांपैकी पाच लोकल ट्रेन सुद्धा या ब्लॉकमुळे रद्द केल्या आहेत. परिणामी प्रवास वेळात विलंब व पर्यायी मार्गांमुळे प्रवासी गैरसोयींचा सामना करू शकतात.

नोकरदार, दैनिक प्रवासी आणि व्यावसायिक प्रवाशांची यामुळे मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. पर्यायी बस अथवा राज्य परिवहन वाहन किंवा इतर रेल्वे मार्गांचा विचार करावा.  आपले तिकिट रद्द किंवा रिफंड किंवा बदलायचे असल्यास IRCTC पोर्टल, स्थानक काउंटर किंवा मध्य रेल्वेच्या अधिकृत घोषणांचा आधार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे रुळ ओलांडणे ठरतंय जीवघेणं

पुणे रेल्वे विभागात रेल्वे रुळ ओलांडताना अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. याची आकडेवारी आता समोर आली आहे. यामध्ये जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या अपघातांची संख्या 301 वर पोहोचली आहे. या अपघातांमध्ये मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे ट्रेनखाली येणे किंवा रुळांच्या जवळ असलेल्या व्यक्तींचा ट्रेनशी संपर्क होणे हे आहे. अनेक वेळा हे प्रकार मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर घडतात. तसेच गाडी रुळावरून घसरणे, इतर गाड्यांशी टक्कर होणे किंवा मानवी चुकांमुळेही जीवितहानी झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2025 या काळात पुणे विभागातील एकूण 107 स्थानकांवर या अपघाती घटनांची नोंद झाली आहे.

रेल्वे रुळ ओलांडणे ठरतंय जीवघेणं; पुणे रेल्वे विभागात सप्टेंबर अखेरपर्यंत ‘इतक्या’ अपघातांची नोंद
या पार्श्वभूमीवर रेल्वे पुणे विभागाकडून अपघात रोखण्यासाठी विशेष पावले उचलण्यात आली आहेत. एकूण 296 जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या असून, रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कडून प्रभावित ठिकाणी विशेष मोहीम राबविली जात आहे. ट्रेनपास करणाऱ्यांविरुद्ध १८८३ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. तसेच धोकादायक ठिकाणी बाउंड्री वॉल बांधकामासाठी अभियांत्रिकी विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जनजागृतीसाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याची माहिती रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिली.

Web Title: Mumbai pune railway route 19 hour mega block deccan and pragati express are cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 09:08 PM

Topics:  

  • Megablock
  • Mumbai News
  • pune news
  • railway

संबंधित बातम्या

Navabharat Influencer Summit 2025: असा मंच जो सामाजिक बदल घडवणाऱ्या इन्फ्लुएंसर्सचा करेल सन्मान
1

Navabharat Influencer Summit 2025: असा मंच जो सामाजिक बदल घडवणाऱ्या इन्फ्लुएंसर्सचा करेल सन्मान

Mangal Prabhat Lodha: छट पूजेदरम्यान मेट्रो आणि बससेवा उशिरापर्यंत सुरू; मंत्री लोढांच्या प्रयत्नांना यश
2

Mangal Prabhat Lodha: छट पूजेदरम्यान मेट्रो आणि बससेवा उशिरापर्यंत सुरू; मंत्री लोढांच्या प्रयत्नांना यश

शिवसेनेच्या वरिष्ठांनी धंगेकरांना समज द्यावी, नाहीतर…; भाजप नेत्याने दिला इशारा
3

शिवसेनेच्या वरिष्ठांनी धंगेकरांना समज द्यावी, नाहीतर…; भाजप नेत्याने दिला इशारा

कर्वेनगर येथील धनुर्विद्या क्रीडा संकुलाचा मार्ग अखेर मोकळा; दुधानेंच्या पाठपुराव्याला यश
4

कर्वेनगर येथील धनुर्विद्या क्रीडा संकुलाचा मार्ग अखेर मोकळा; दुधानेंच्या पाठपुराव्याला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.