Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

 सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधरवरील मेट्रो सेवेने सुरू झाल्यापासून ते आजतागायत या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रवासी संख्येचा एकूण 1,15,28,297 इतका टप्पा गाठला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 17, 2025 | 08:00 PM
Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा
Follow Us
Close
Follow Us:
  • नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन!
  • अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

नवी मुंबई : सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधरवरील मेट्रो सेवेने सुरू झाल्यापासून ते आजतागायत या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रवासी संख्येचा एकूण 1,15,28,297 इतका टप्पा गाठला आहे. सिडको मेट्रोच्या या दैदीप्यमान यशाकरिता सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मेट्रोच्या टीमचे अभिनंदन केले आहे. “मागील दोन वर्षांच्या कालावधीत मेट्रो सेवेच्या प्रवासी संख्येने गाठलेला एक कोटींहून अधिक आकडा हा मेट्रो सेवेला लाभत असलेला प्रवाशांच्या उदंड प्रतिसादाचे प्रतीक आहे. या मेट्रो मार्गामुळे बेलापूर, खारघर व तळोजा परिसरातील कार्यालये, गृहसंकुले व उद्योग-व्यवसाय यांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी लाभली आहे. नवी मुंबईकरांनी सिडकोच्या मेट्रो सेवेप्रति दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.” असं उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको विजय सिंघल यांनी म्हटलं.

सिडकोतर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याकरिता नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला असून दि. 17 नोव्हेंबर 2023 पासून या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. मेट्रोची सेवा पंतप्रधान मोदी यांच्या शुभहस्ते 12 जानेवारी 2024 रोजी देशाला समर्पित करण्यात आली. या मेट्रो सेवेमुळे सीबीडी बेलापूर, खारघर आणि तळोजा परिसराला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे.

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

मेट्रोसेवा अधिक कार्यक्षम करण्याकरिता सिडकोतर्फे वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन करण्यात येऊन सध्या गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी बेलापूर व तळोजा स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांना मेट्रोच्या फेऱ्या उपलब्ध आहेत. तर उर्वरित वेळांमध्ये दर पंधरा मिनिटांनी मेट्रोची फेरी उपलब्ध आहे. मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्यात येऊन सध्या तिकीटाचा किमान दर रु. 10 व कमाल रु. 30 इतका आहे. या प्रवासीस्नेही सुधारणांमुळे सदर मार्गावरील मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. यामुळे अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये मेट्रोच्या प्रवासी संख्येचा एक कोटीहून अधिक टप्पा गाठणे शक्य झाले आहे.

मेट्रो मार्ग क्र. 1 चा विस्तार बेलापूरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत करण्यात येणार आहे. तसेच 16 कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग क्र. 2 पेंधर ते तळोजा एमआयडीसी दरम्यान नियोजित असून कळंबोली आणि कामोठे मार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत या मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे.

Mumbai CNG Shortage: वाहतुकीचा बोजवारा! मुंबईत सीएनजी पुरवठा विस्कळीत, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Web Title: Navi mumbai metros new milestone reaches the milestone of more than 1 crore passengers in just 2 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai Metro
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात
1

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
2

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Kolhapur : जयसिंगपूरमध्य़े आघाडीचा उमेदवार ठरला; निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी
3

Kolhapur : जयसिंगपूरमध्य़े आघाडीचा उमेदवार ठरला; निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी

Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
4

Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.