“पालकमंत्री असताना सुधारणा का केली नाही?”, मंदा म्हात्रेंची गणेश नाईकांवर टीका
गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईतील 14 गावं बाहेर काढण्यावरून शिवसेना शिंदे गट आणि गणेश नाईकांच्या समर्थकांमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळाला. कधी नव्हे ते महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. आता याच प्रकरणात भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी सुद्धा भाष्य केले आहे.
मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांवर निशाणा साधत म्हटले की, “गणेश नाईक फक्त नवी मुंबईचे नाहीत, तर महाराष्ट्राचे मंत्री आहेत. जेव्हा १४ गावे बाहेर काढायची होती, तेव्हापासून मी त्यांच्या सोबत आहे आणि आजही त्यांच्या सोबत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने सांगितले जाते की ही गावे काढून टाकू, मात्र मी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की ही १४ गावे दत्तक घेऊन महाराष्ट्र शासनाकडे असावीत.
गणेश नाईक यांनी पालकमंत्री असताना या गावांमध्ये सुधारणा का केली नाही? आज या १४ गावांना नवी मुंबई महापालिकेत का समाविष्ट करायचे नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. नवी मुंबई महापालिकेवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही, शासन हा भार उचलेल. तसेच मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले आहे की १४ गावे बाहेर काढू नयेत.
नवी मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार करून पालिका लुटून खालली. नाव घेऊन सांगेल की, पालिका कोणी कोणी कशी लुटली. जर या ग्रामस्थांना सुख सुविधा मिळाल्या, तर काय चुकीचे आहे. मी सुद्धा या गावकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे आणि बघते की कोण १४ गावे बाहेर काढणार आहे.
मनोज जरांगेंनी बोलताना मर्यादा पाळावी, आरक्षणाचा लढा हा…; काँग्रेसच्या नेत्याने सुनावले खडेबोल
पुढे मंदा म्हात्रे म्हणाल्या,”गणेश नाईक यांच्याकडे मंत्री पद आहे. त्यांनी नवीन महानगरपालिका द्यावी. ते काय फक्त नवी मुंबईचे मंत्री नाही तर महाराष्ट्राचे मंत्री आहेत.”