Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यात विघ्न येऊ नये म्हणून राणा दाम्पत्याचे हनुमान चालिसा आंदोलन स्थगित, फेसबुक लाईव्हद्वारे घोषणा

उद्या देशाचे पंतप्रधान (PM Narendra Modi In Mumbai) मुंबईत येत आहे. एक आमदार आणि खासदार म्हणून आमचं कर्तव्य आहे की, जर पंतप्रधानांसारखं मोठं व्यक्तिमत्व आपल्या राज्यात येत असेल तर त्यांच्या दौऱ्याला कुठल्याही प्रकारे गालबोट लागता कामा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात कुठलंही विघ्न नको म्हणून आपण आंदोलन मागे घेत असल्याचं आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी जाहीर केलं आहे.

  • By साधना
Updated On: Apr 23, 2022 | 03:19 PM
navneet and ravi rana

navneet and ravi rana

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धारावर ठाम होते. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनीही राणा दाम्पत्याला मातोश्रीबाहेर येऊन दाखवण्याचं आव्हानच दिलं. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी पोलिसांचे बॅरिकेडिंग ओलांडून थेट राणा दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीच्या खाली धडकले. यामुळे मुंबईतील एकूणच परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली.

दुपारी २.४० वाजण्याच्या सुमारास खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या (PM Narendra Modi Mumbai Visit) दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मोदींचा दौरा रद्द व्हावा असा काही लोकांचा इरादा आहे. पण त्यामुळे मी माझं आंदोलन मागे घेत आहे, असं आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलं.

आमदार रवी राणा म्हणाले, हनुमान चालिसा पठण करण्याची मी हात जोडून मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. राज्यावर आलेलं संकट, शेतकऱ्यांवर आलेलं संकट, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर अनेक संकट आली आहेत. तेव्हापासून राज्यातील जनता त्रस्त आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा आमच्या ह्रदयात आहेत. मातोश्री आमच्या ह्रदयात आहे. मी कुठलंही चुकीचं भाष्य केलं नाही.

[read_also content=”छातीत वारंवार दुखणे, अस्वस्थता किंवा चक्कर येणे; हे केवळ हृदयविकारच नाही, तर ‘या’ आजाराचे असू शकते लक्षण https://www.navarashtra.com/lifestyle/cardiophobia-chest-pain-and-dizziness-is-not-just-heartattack-can-be-reason-of-this-disease-nrak-272301/”]

आज आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी जात होतो पण पोलिसांनी आम्हाला रोखलं. आम्हाला घरात डिटेन करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना पाठवून आमच्या घरावर हल्ला केला. असं वातावरण तयार केलं की, कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा आदेश या शिवसैनिकांना आहे. जर मुख्यमंत्री कायदा-सुव्यवस्था बिघडवत असतील तर हे राज्याचं दुर्दैव आहे. महाराष्ट्राची वाटचाल पश्चिम बंगालच्या दिशेने होत आहे.

उद्या देशाचे पंतप्रधान मुंबईत येत आहे. एक आमदार आणि खासदार म्हणून आमचं कर्तव्य आहे की, जर पंतप्रधानांसारखं मोठं व्यक्तीमत्व आपल्या राज्यात येत असेल तर त्यांच्या दौऱ्याला कुठल्याही प्रकारे गालबोट लागता कामा नाही. वेळेत वेळ काढून जर मोदी मुंबईत येत आहेत तर मुंबईसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात कुठलंही विघ्न नको म्हणून आपण आंदोलन मागे घेत असल्याचं आमदार रवी राणा यांनी जाहीर केलं आहे.

Web Title: Navneet and ravi rana called off their plan of hanuman chalisa recitation at matoshree nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2022 | 03:11 PM

Topics:  

  • Hanuman Chalisa
  • Modi In Mumbai
  • Navneet Rana
  • Ravi Rana

संबंधित बातम्या

हनुमानजींच्या शेपटीने संपूर्ण लंका जाळली… यात कोणत्या शक्तीचे वास्तव आहे तुम्हाला माहिती आहे का? अनेकांना ठाऊक नाही याचे रहस्य
1

हनुमानजींच्या शेपटीने संपूर्ण लंका जाळली… यात कोणत्या शक्तीचे वास्तव आहे तुम्हाला माहिती आहे का? अनेकांना ठाऊक नाही याचे रहस्य

आज आहे सर्वात पहिला मोठा मंगळवार, बजरंगबली हनुमानाची आजच करा पूजा; पूर्ण होतील सर्व इच्छा
2

आज आहे सर्वात पहिला मोठा मंगळवार, बजरंगबली हनुमानाची आजच करा पूजा; पूर्ण होतील सर्व इच्छा

Navneet Rana : “हिंदू शेरनी तुझे उड़ा देंगे…”, भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी
3

Navneet Rana : “हिंदू शेरनी तुझे उड़ा देंगे…”, भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; मुख्यमंत्र्यांसह परराष्ट्रमंत्री, रेल्वेमंत्रीही राहणार हजर
4

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; मुख्यमंत्र्यांसह परराष्ट्रमंत्री, रेल्वेमंत्रीही राहणार हजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.