शिर्सुफळ : श्री शिरसाई देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवाला २६ सप्टेंबरपासून सुरवात झाली. उत्सवात घटस्थापनेनंतर नऊ दिवस देवीच्या विविध रूपाची पूजा केली जाते. तसेच छबिना पालखी निघते. तसेच ३ ऑक्टोबर ला पूर्णाहुती कार्यक्रम, तर तसेच ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी पालखी ग्रामप्रदक्षिणा करून मंदिरात येईल. त्यानंतर देवी मंचकी निद्रा होईल. ९ ऑक्टोबरला पहाटे देविची महापूजा होणार असल्याची माहिती देवीचे पुजारी संजय गुरव यांनी दिली.