Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विखे पाटील कुटुंबाचा मला अभिमान’; निलेश लंके यांचं विधान चर्चेत

शरद पवार गटाचे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबियांबदद्ल सूचक विधान केले. याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 20, 2024 | 11:53 AM
निलेश लंके यांचे विखे पाटील कुटुंबियांबाबत सूचक विधान

निलेश लंके यांचे विखे पाटील कुटुंबियांबाबत सूचक विधान

Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. विखे पाटील यांचा गड समजल्या जाणाऱ्या अहमदनगरमध्ये निलेश लंके यांनी विजयी गुलाल उधळला. महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली होती. शरद पवार गटाकडून निवणुकीआधी अजित पवार गटातून आलेल्या निलेश लंके यांना संधी देण्यात आली होती. निकालानंतर आता निलेश लंके यांचे विखे पाटील कुटुंबाबद्दल अभिमान असल्याचे वक्तव्य चर्चेत आले आहे.

निलेश लंके काय म्हणाले?

एका कार्यक्रमावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, “लोकसभा निवडणुकीमध्ये मी ज्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुकीला उभा होतो. पण आता निवडणुकीचा निकाल लागला, निवडणूक झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका टिप्पणी करणे योग्य नाही. विखे कुटुंबिय हे जिल्ह्यात मोठं कुटुंबिय असून त्यांचं सहकार क्षेत्रात मोठं काम आहे. निवडणूक लढवत असताना त्यांच्या विरोधात बोलणं योग्य आहे. निवडणुकीच्या प्रचारात बोलताना एखादा शब्द माझ्याकडून त्यांच्यावर घसरला असेल किंवा त्यांच्याकडून माझ्यावर घसरला असेल. पण आता तेच मनावर घेऊन बसायचं का?”, असं निलेश लंके यांनी म्हटलं.

मी त्यांना सांगेल मला आशीर्वाद द्या

पुढे ते म्हणाले, “मलाही हे मान्य करावे लागेल की जिल्ह्यात सहकार क्षेत्रात विखे कुटुंबियाचं मोठं काम आहे. मी ज्यावेळी राज्यात फिरतो त्यावेळी मी अभिमानाने सांगतो की, आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी केला. मलाही अभिमान आहे. जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर मी अभिमानाने सांगतो की, राज्याचे महसूल मंत्री माझ्या जिल्ह्यातील आहेत. ते विरोधक असले तर त्यांच्याविरोधात काहीही बोलायचं का?” जिल्ह्याचे पालकमंत्री हे राधाकृष्ण विखे पाटील आहेत. जिल्हा नियोजन समितीची असली की मी सुद्धा त्यांना सांगेल की मला आशीर्वाद द्या. मीही त्यांच्याकडे एखादे काम हक्काने घेऊन जावू जाईल. अशा पद्धतीचे राजकारण असलं पाहिजे. आपण लहान माणसांनी लहान माणसासारखं वागलं पाहिजे”, असे स्पष्ट मत निलेश लंके यांनी मांडले. त्यांच्या या राजकीय भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले आहे.

Web Title: Ncp ahmednagar mp nilesh lanke appreciate minister radhakrishna vikhe patil and sujay vikhe patil nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2024 | 11:52 AM

Topics:  

  • Nilesh Lanke
  • Radhakrishna Vikhe Patil
  • Sujay Vikhe-Patil

संबंधित बातम्या

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके
1

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Manoj Jarange Patil: राज्य सरकारला जरांगे पाटलांचा धसका; विखे पाटलांनी कामाच्या हालचाली वाढवल्या
2

Manoj Jarange Patil: राज्य सरकारला जरांगे पाटलांचा धसका; विखे पाटलांनी कामाच्या हालचाली वाढवल्या

Maratha Reservation: “जीआरबाबत ज्यांना शंका त्यांनी…”; जरांगे पाटलांच्या भेटीदरम्यान काय म्हणाले विखे पाटील?
3

Maratha Reservation: “जीआरबाबत ज्यांना शंका त्यांनी…”; जरांगे पाटलांच्या भेटीदरम्यान काय म्हणाले विखे पाटील?

Maratha Reservation Live: काहीतरी मोठं घडणार! आरक्षणाचा मसुदा जरांगे पाटलांना पाठवला; विखे पाटील थेट…
4

Maratha Reservation Live: काहीतरी मोठं घडणार! आरक्षणाचा मसुदा जरांगे पाटलांना पाठवला; विखे पाटील थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.